नागपूर, 04 जानेवारी : ‘प्रेम हे प्रेम असतं…’ अशाच एका आगळ्यावेगळ्या प्रेमाचे रुपांतर आता लवकरच लग्नात होणार आहे. समाज आणि लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जावून दोन तरुणींनी साखरपुडा ( girls Engagement in nagpur) उरकला आहे. समलैंगिकतेकडे आकसाने पाहणाऱ्यांना या नागपूरच्या तरुणींनी आपल्या कृतीतून कडक उत्तर दिले आहे. समलैंगिकतेला (Homosexuality) आपल्याकडे कायद्याने मान्यता नाही व समाजामध्ये ही याकडे वेगळ्या दृष्टीने बघतील जातंय, पण असं असताना देखील नागपूरमध्ये दोन मुलींनी साखरपुडा केला आहे. या साखरपुड्याला त्यांनी कमिटमेंट एनिव्हर्सरी असं नाव दिलं आहे. सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी असं या धाडसी तरुणीचं नाव आहे. या दोघी भविष्यात लग्न देखील करणार आहे व त्या लग्नाला नाव देणार आहे सिविल युनियन..!
सुरभी मित्रा (Surabhi Mitra ) ही डॉक्टर आहे तर पारोमिता मुखर्जी (Paromita Mukherjee ) ही एका खासगी कंपनीमध्ये मोठ्या हुद्यावर नोकरीला आहे. अलीकडे या दोघींचा नागपूरमध्ये एका रिसॉर्टवर साखरपुडा पार पडला. या दोघांच्या साखरपुड्याला दोघींच्या घरच्या मंडळींना पाठिंबा दिला. येत्या वर्षभरातच दोघींचे लग्न होणार आहेत.
( मला ओबीसींवर फारसा विश्वास नाही, जितेंद्र आव्हाडांचं OBC मेळाव्यात वक्तव्य ) सुरुवातीला पारोमिता मुखर्जी हिच्या कुटुंबीयाकडून या संबंधाचा विरोध झाला होता. मात्र मुलीच्या प्रेमापोटी पारोमिताच्या वडिलांनी संबंध मान्य केला. पारोमिता ही मूळची कोलकत्याची आहे तर सुरभी ही नागपूरची आहे. दोघींनी आपल्या भविष्याची स्वप्न देखील रंगवायला सुरुवात केली . त्यांचे घर कसे असणार, कुटुंब कसे असणार कुटुंबातले सदस्य कोण असणार, त्यांना मुलगा कसा होणार याचे पारोमिता व सुरभी यांनी आतापासूनच नियोजन करून ठेवले. दोघीचे ही कुटुंब हे उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाची समजूत काढायला वेळ लागला नाही. दोघींच्या कॉमन मित्राने देखील या संबंधाला मान्यता दिली आहे.
…आणि वडिलांनी समजून घेतलं! ‘मला लहानपणापासून कधी या गोष्टीचा विरोध झाला नाही. माझ्या मित्र, नातेवाईक यांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांनी कधीच विरोध केला नाही. मला कधीच कुणी विरोध सुद्धा केला नाही. मी माझ्या वडिलांना वयाच्या १९ व्या वर्षी सांगितलं होतं. त्यावेळी बाबा माझ्यावर काही चिडले नाही, रागावले नाही. त्यांनी मला समजून घेतलं एक दोन वर्षात हे निघून जाईल, मैत्रिणींमध्ये असं होत असतं असं सांगतील. पण नंतर दोन वर्ष माझ्यात असे काही बदल झाले नाही. मला नाही वाटत की मी पुरुषासोबत लग्न करून राहू शकते. हे मी वडिलांना सांगितले, ते डॉक्टर असल्यामुळे त्यांनीही समजून घेतलं. त्यांनी खूप सगळे लेख वाचले अभ्यास केला, सगळ्यांशी चर्चा केली आणि हे नैसर्गिक आहे असं सांगून त्यांनी स्वीकारलं’, असं सुरभीने सांगितलं.
( आलियासाठी रणबीर कपूरनं विमानतळावर केलं असं काही की.., Video Viral ) तसंच, ‘आईचा सुरुवातीला विरोध होता, तुम्ही घरी राहावं, बाहेर सांगण्याची आवश्यकता नाही, असं तिचं म्हणणं होतं. पण मी अनेक कार्यक्रमात हजर राहत होते, चर्चासत्र, व्याख्यानं देत होती, त्यामुळे मी ज्या समुदायामधून आले आहे, त्याबद्दल मी बोलणारच आहे. मी एक डॉक्टर आहे आणि जर या समुदायाबद्दल सांगितलं तर लोक स्विकारतील, असंही सुरभीने ठामपणे सांगितलं. कॉन्फरन्समध्ये झाली भेट! तर, आमची कोलकात्यामध्ये भेट झाली होती. एक कॉन्फरन्स होती. त्या कॉन्फरन्समध्ये त्या होस्ट होत्या. त्याबद्दल मला खूप चांगलं वाटलं, त्यानंतर मी त्यांना तुमच्याशी बोलायचं असं सांगितलं. त्यानंतर आम्ही इन्स्टाग्रामवर चॅट करत होतो. त्यानंतर आम्ही एकत्र येण्याचं ठरवलं, असं पारोमिता मुखर्जी हिने सांगितलं. माझ्या घरी वडील आणि ताईला माझ्याबद्दल माहिती होती. मी जेव्हा अकरावीला होते. तर आईला अलीकडेच कळलं आहे. पण त्यांनी मला समजून घेतलं, मी काही चुकीचं करत नाही हे त्यांना जाणवलं, त्यांनी आता स्विकारलं आहे, असंही मुखर्जी यांनी सांगितलं.