जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / मला ओबीसींवर फारसा विश्वास नाही, जितेंद्र आव्हाडांचं OBC मेळाव्यात वक्तव्य

मला ओबीसींवर फारसा विश्वास नाही, जितेंद्र आव्हाडांचं OBC मेळाव्यात वक्तव्य

'मंडळ आयोग आला होता, तो ओबीसी समाजासाठी होता. पण आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा obc मैदानात लढायला नव्हते'

'मंडळ आयोग आला होता, तो ओबीसी समाजासाठी होता. पण आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा obc मैदानात लढायला नव्हते'

‘मंडळ आयोग आला होता, तो ओबीसी समाजासाठी होता. पण आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा obc मैदानात लढायला नव्हते’

  • -MIN READ
  • Last Updated :

निखील चव्हाण, प्रतिनिधी ठाणे, 03 जानेवारी : ‘ओबीसींवर (obc) माझा फारसा विश्वास नाही. कारण मंडळ आयोग आला होता, तो ओबीसी समाजासाठी होता. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी मैदानात नव्हते, त्यावेळी महार आणि दलित समाज मैदानात होता’ असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीकडून महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी ठाणे शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक केलेल्या सावित्रीच्या मुलींचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक नगरसेवक, ठाणे महापालिका अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना आव्हाड यांनी ओबीसी समाजावर विश्वास नसल्याचे विधान करून इतिहासाचा दाखला दिला, मला ‘ओबीसींवर माझा फारसा विश्वास नाही. कारण मंडळ आयोग आला होता, ते ओबीसी समाजासाठी होते. पण आरक्षण मागण्यासाठी जेव्हा लढायचं होतं तेव्हा obc मैदानात लढायला नव्हते, लढायला महार आणि दलित होते कारण ओबीसींना लढायचंच नव्हतं आणि लढायचं सुद्धा नव्हतं ओबीसींवर ब्राम्हण वादाचा इतका बडगा बसला आहे की आपण श्रेष्ठ आहोत असा समाज झाला आहे, पण त्यांना माहित नाही आपल्या पूर्वजांना देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाही आणि हे सगळे विसरले आहे, असं आव्हाड म्हणाले, तसंच, आता ओबीसी आरक्षणासाठी पुढे येत आहे, पण घरात बसून आणि व्हॉट्सअॅप करून आरक्षण मिळणार नाही तर सरकारशी दोन हात करावे लागतील. आज जर ५० टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्रात हे राज्य पुढे जाऊ शकणार नाही हे लक्षात घ्यावे लागेल. भूमिपूत्रांचा वेगळा पगडा असतो. पण लढायचं नाही, असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी" असंही आव्हाड म्हणाले. या आधीही जितेंद्र आव्हाड यांनी obc आरक्षणासाठी केंद्र सरकारावर इम्पिरिकल डाटा देण्यावरून टीका करताना दिसून आले. तर नुकत्याच झालेल्या अधिवेशनात obc आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक देखील पुढे ढकलण्याचे सर्वानुमते निर्णय झाला असताना आता स्वत: obc असून आपल्या समाजावर नाराज झालेले जितेंद्र आव्हाड पाहायला मिळाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात