जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मोठी बातमी! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, आता या तारखेनंतर होणार

मोठी बातमी! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, आता या तारखेनंतर होणार

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर (फाईल फोटो)

सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर (फाईल फोटो)

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 29 जून : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 30 जूननंतर होणाऱ्या संस्थांच्या निवडणुका आता 30 सप्टेंबर नंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 42 हजार 157 संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून 6 हजार 510 संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक ठिकाणी निवडणूक घेणं कठीण होतं. यासोबतच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. ज्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, अशा संस्थांचं निवडणूक कामकाज पूर्णपणे पावसाळ्यात होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण होऊ शकते. याच कारणांमुळे निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलं आहे. पवारांनी डबल गेम केला, पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांचा गौप्यस्फोट राज्यात 82 हजार 631 सहकारी संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यापैकी 49,333 सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या असून 48 हजार 667 संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. राज्यातील 42 हजार 157 संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असून 6 हजार 510 संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहेत. राज्यात 30 जूननंतर पर्जन्यमानाचं स्वरूप जास्त असल्याने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, पावसामुळे जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अशात जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभागी होता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे . यामुळे हजारो सहकारी आणि गृहनिर्माण संस्थांच्या लाखो पदाधिकारी आणि मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात