जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'जशी प्रेयसीची आठवण, तशी 40 खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची' खडसेंनी कवितेतून शिंदेंना लगावला टोला, VIDEO

'जशी प्रेयसीची आठवण, तशी 40 खोकेवाल्या आमदारांना गुवाहाटीची' खडसेंनी कवितेतून शिंदेंना लगावला टोला, VIDEO

 'एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीला चालले आहे. आमदारांना दाखवून देणार आहे, आठवण करून देणार आहे. जशी एका प्रेयसीची आठवण असते'

'एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीला चालले आहे. आमदारांना दाखवून देणार आहे, आठवण करून देणार आहे. जशी एका प्रेयसीची आठवण असते'

‘एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीला चालले आहे. आमदारांना दाखवून देणार आहे, आठवण करून देणार आहे. जशी एका प्रेयसीची आठवण असते’

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

इम्तियाज अली, प्रतिनिधी मुक्ताईनगर, 17 नोव्हेंबर : ‘जशी एका प्रेयसीची आठवण असते, भेट तुझी आणि माझी, अजून त्या दिवसाची, धुंद वाऱ्याची, रात्र पावसाची, तशी हे 40 खोकेवाल्यांना गुवाहाटीला घेऊन जाणार आहे. बाबा रे काय ती झाडी काय, तो डोंगर, काय ते हॉटेल, या परत या आपण आपल्या आठवणी जाग्या करूया, म्हणून एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला चालले आहे’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सणसणीत टोला लगावला. एकनाथ खडसे मुक्ताईनगरच्या अंतुरली गावात जनसंवाद यात्रेसाठी आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर कवितेतून टीकास्त्र सोडले.

जाहिरात

‘एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा गुवाहाटीला चालले आहे. आमदारांना दाखवून देणार आहे, आठवण करून देणार आहे. जशी एका प्रेयसीची आठवण असते, भेट तुझी आणि माझी, अजून त्या दिवसाची, धुंद वाऱ्याची, रात्र पावसाची, तशी हे 40 खोकेवाल्यांना गुवाहाटीला घेऊन जाणार आहे. बाबा रे काय ती झाडी काय, तो डोंगर, काय ते हॉटेल, या परत या आपण आपल्या आठवणी जाग्या करूया, म्हणून एकनाथ शिंदे हे 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला चालले आहे’ असा खुमासदार टोला खडसेंनी शिंदेंना लगावला. (ठाकरे पिता पुत्रांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर..’ शिंदे गटाचा ठाकरेंवर प्रहार) तसंच, ‘तुम्हाला गुवाहाटीला जायचं असेल तर नक्की जा, विमानाने जा. पण गोरगरिबांना 2 रुपये किलोनं धान्य तर द्या.. तुम्हाला काय करायचे ते करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरी थांबवा. तरुण शेतकरी आत्महत्या करत आहे. सदन शेतकरी आत्महत्या करत आहे. जळगाव जिल्ह्यात 3 महिन्यात सर्वात जास्त संख्या आहे. जळगाव जिल्हा हा केळी बागायतदारांचा आहे, कापसावाला आहे, हे दुर्दैवी आहे’ अशी टीकाही खडसेंनी केली. ‘या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. कसला कायदा कसली सुव्यवस्था सर्व सुस्तीत आणि सर्व मस्तीत चालू आहे, अशी टीकाही खडसेंनी केली. (नारायण राणे नरमले, BMC चा जेसीबी येण्याआधीच बंगल्यावर स्वत: चालवला हातोडा!) मला राष्ट्रवादीमध्ये यावं लागलं. रोहिणी खडसे यांनी तिकीट दिलं. पण मुलीला तिकीट दिलं आणि व्यवस्था काय केली तर पाडण्याची. गद्दारी भाजपने केली, गद्दारी गिरीश महाजन यांनी केली. हे मी सांगत नाही तर मुख्यमंत्री शिंदे मुक्ताईनगरमध्ये आले, त्यांनी स्वतः सभेमध्ये सांगितलं. एका बाजूला तिकीट द्यायचं आणि दुसरीकडे हरवायचं ही गद्दारी भाजपने केली. मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटील निवडून आले यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे, तो गिरीश महाजन यांचा त्यामुळे गिरीश महाजन यांनीच गद्दारी केली अशी पावतीच मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे, असं म्हणत खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात