जळगाव, 3 डिसेंबर : महाराष्ट्र, कर्नाटक सीमावादावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या देशात प्रांतवाद टोकाला गेला आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही दोन्ही मुख्यमंत्री वेगवेगळी भूमिका मांडत आहेत. अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर आपली भूमिकाच स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले कर्नाटकमध्ये जाणार नाही. म्हणजे या देशांमध्ये एकमेकांच्या राज्यात जाण्यास बंदी आहे का? अशा प्रकारचं वक्तव्य करण देशद्रोह नाही का? असे अनेक सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केले आहेत.
नेमकं काय म्हणाले खडसे?
एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सीमावादावरून एकनाथ शिंदे आणि भाजपावर निशाणा साधला आहे. या देशात प्रांतवाद टोकाला गेला आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही दोन्ही मुख्यमंत्री वेगवेगळी भूमिका मांडत आहे. अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तर आपली भूमिकाच स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले कर्नाटकमध्ये जाणार नाही. म्हणजे या देशांमध्ये एकमेकांच्या राज्यात जाण्यास बंदी आहे का? अशा प्रकारचं वक्तव्य करण देशद्रोह नाही का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली त्यावेळी.. विखेंकडून राऊंताच्या टीकेचा समाचार
भाजपानं भूमिका स्पष्ट करावी
दरम्यान दोन्ही राज्यात एकाच पक्षाची सत्ता आहे. मात्र दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी आहे. याबाबत भाजपाने भूमिका स्पष्ट करावी असं एकनाथ खडेसे यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे आम्ही कर्नाटक राज्यात जाऊ, त्यांनी जाऊन दाखवावं असं आवाहनही यावेळी एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.