शिर्डी : भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ते शिर्डीमध्ये बोलत होते. सामनामधून विखे पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यपालांचे वक्तव्य वेदनादायी आहे, त्याचे कुणीच समर्थन करू शकत नाही. उदयनराजे यांच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्या देखील भावना आहेत. त्यामुळे उदयनराजेंकडे वंशज असल्याचे दाखले मागणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, अशा शब्दात विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले विखे पाटील?
राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज्यपालांचे वक्तव्य वेदनादायी आहे, त्याचे कुणीच समर्थन करू शकत नाही. उदयनराजे यांच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्या देखील भावना आहेत. त्यामुळे उदयनराजेंकडे वंशज असल्याचे दाखले मागणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये अशा शब्दात विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचे भांडवल करून यांचा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आहे. राज्यपालांबद्दलच्या माझ्या वक्तव्याचा उलट सुलट अर्थ काढला. औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली त्यावेळी तुमचा मर्दपणा कुठे गेला होता? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा : Video : लेकीचा फोटो पाहून सुषमा अंधारेंना आश्रू अनावर; भर सभेत रडल्या
'समृद्धी महामार्गाचे उद्घाट हा ऐतिहासिक क्षण'
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समृद्धी महामार्गाची पहाणी करणार आहेत. यावर देखील विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. समृद्धी महामार्गाचे उद्घाटन हा एक ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षण ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महामार्गाची पहाणी करणार आहेत. हा महामार्ग म्हणजे विदर्भ मुबंईच्या दृष्टीने लाईफलाईन असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.