मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'गिरीश महाजन शिवसेनेला बेडूक म्हणतात, मग बेडकाबरोबर कसे काय जातात?', एकनाथ खडसेंच्या कानपिचक्या

'गिरीश महाजन शिवसेनेला बेडूक म्हणतात, मग बेडकाबरोबर कसे काय जातात?', एकनाथ खडसेंच्या कानपिचक्या

गिरीश महाजन यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गिरीश महाजन यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गिरीश महाजन यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

जळगाव, 15 मे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शनिवारी संध्याकाळी मुंबईच्या बीकेसी मैदानात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली. त्यांच्या टीकेवर भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी गिरीश महाजन यांची जीभ घसरली. शिवसेना म्हणजे गटारातली बेडूक, असा घणाघात गिरीश महाजनांनी केला. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचा देखील उल्लेख केला. गिरीश महाजन अनेकदा गुलाबराव पाटील यांच्यासोबत भेटून चहा घेतात, जेवण करतात. ते बेडका बरोबर कसे काय जातात? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.

एकनाख खडसे नेमकं काय म्हणाले?

"गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका करताना गटारीतील बेडूक आहे अशा स्वरुपाची टीका केली आहे. मला वाटते याचे उत्तर तर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले पाहिजे. बेडूक आहे का हत्ती आहे? गिरीश महाजन सातत्याने महाविकासआघाडीवर टीका करतात. शिवसेनेला बेडूक म्हणतात. ते एकीकडे शिवसेनेला हिणवतात आणि दुसऱ्या बाजूला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबरोबर जाऊन चहा घेतात, जेवण करतात, छुपी युती करतात. जळगाव जिल्ह्याचे चित्र वेगळं आहे. बेडकाबरोबर कसे काय ते जातात मला माहित नाही. याचं सविस्तर उत्तर जे आहे ते शिवसेनेच्या अधिकृत प्रवक्त्याने देणे आवश्यक आहे", असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला.

केतकी चितळेच्या टीकेवर प्रतिक्रिया

"अलीकडे राजकीय नेत्यांवर टीका टिप्पणी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ही वस्तुस्थिती आहे. अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवारांवरती टीका केली आहे. शरद पवारांचा राजकीय प्रवास हा पंचावन्न वर्षांचा आहे. समाज जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये त्यांचे योगदान फार मोठं राहिलेलं आहे. केतकी चितळेला मी अजूनही ओळखत नव्हतो. अलीकडे ती प्रकाशझोतात आली आहे. तेही त्या टीकाटिपप्णीमुळे प्रकाशझोतात आलेली दिसत आहे. अशा स्वरुपाची टीका करणं ही संस्कृती नाही. केतकी चितळेवर त्यांच्या कुटुंबाने असेच संस्कार केले असावेत म्हणून त्यांच्या तोंडून असे वक्तव्य निघत आहेत. शासनाने त्यांच्यावर उचित कारवाई केली. मी शासनाचा अभिनंदन करतो", अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

('...म्हणून 2005 साली बाळासाहेब ठाकरे कृष्णकुंजवर राहायला गेले'', MNS नेत्याचा मोठा खुलासा)

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

'शिवसेनेची सभा म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेला युती नसती तर शिवसेनेचे पंचवीस आमदारही निवडून आले नसते अशी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी केली. तसंच, 'गटरातील बेंडूक' म्हणून महाजन यांनी शिवसेनेचा (shivsena) उल्लेखही केला. "सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. आमची युती झाली होती. पण आज काय परिस्थिती आहे. आम्हाला जनतेनं पाठिंबा दिला सर्वाधिक जागा दिल्या आहेत. मोदींवर यांना बोलण्याची गरज नाही. यांची लायकी आहे? हे गटारतले बेडूक आहात", असा घणाघात गिरीश महाजनांनी केला होता.

First published: