मुंबई, 25 सप्टेंबर : मागच्या काही काळापासून खाद्य तेलाच्या किंमती वाढल्याने गृहीणींच्या फोडणीवर मर्यादा आल्या होत्या. दरम्यान दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर आठवड्यात खाद्यतेलाचे दर आणखी 10 रुपयांनी उतरले आहेत. यामुळे सामान्यांच्या खिशाला लागणारी चाट काही प्रमाणात कमी झाली आहे. खाद्यतेलाबरोबर सध्या खजूर, रताळीची मोठी आवक बाजारपेठेत झाली आहे.
खजूर 100 ते 260 रुपये किलो तर रताळी 60 रुपये किलोने विक्री सुरू आहे. खाद्यतेलाच्या किमतीत वारंवार वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते. दसरा-दीपावलीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमती उतरू लागल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हे ही वाचा : समुद्रात सापडले जहाजाचे अवशेष, मडक्यांमध्ये सापडल्या अशा वस्तू, आता 'या' रहस्यमयी जहाजाची होतेय चर्चा
क्विटल व किलोचा दर : साखर 3750 ते 3800 (किलो 40 रुपये), खाद्यतेल (15 लिटर) : 2400 (लिटर 160 रु.), शेंग तेल 2700 (किलो 180 रु.) सरकी डबा 2175 (किलो 145 रु.), सोयाबीन तेल 1950 (लिटर 135रु.), पामतेल 2500 (लिटर 135 रु.), खोबरेल तेल 4100 (किलो 280 ते 260 रु.), तांदुळ क्विटल 4000 ते 8400, बिर्याणी राईस 100 ते 200 रुपये किलो.
गहू 3000 ते 4400 (गहू प्रतवारीनुसार), बाजरी 2200 ते 2800 (22 ते 28), ज्वारी 3200 ते 5200 (किलो 32 ते 52). डाळी (किलो दर) : तूर डाळ 110 ते 124, हरभरा डाळ 72 ते 76, मूग 96 ते 110, मसूर डाळ 96 ते 110, मूग डाळ 100 ते 110, मटकी 160, उडीद डाळ 100 ते 120, चवळी 110 ते 120, मसूर 120 ते 400, मसूर डाळ 96 ते 105, मूग गावरान 90 ते 100, वाटाणा हिरवा 100, काळा वटाणा 72 ते 80, काबुली चणा 120 ते 140, साबुदाणा 72 ते 80, खोबरे 160 ते 200, शेंगदाणा 130 ते 140, पोहे 50 ते 54, पातळ पोहे 56 ते 60, दगडी पोहा 60 रुपये.
हे ही वाचा : काय हायवे...काय हॉटेल.., शहाजी बापू पाटलांच्या डायलॉगची पंकजा मुंडेंना भुरळ, VIDEO
मसाल्याचे कडधान्यासह किलोचे दर
तीळ 160 ते 180, मेथी 100, मोहरी 120, जिरे 400, बडिशेप 280 ते 360, धने 160 ते 200, लसून 80 ते 120, दालचिनी 600 ते 800, बदामफूल 1200 ते 1500, मसाला वेलची 1000 ते 1200, त्रिफळ 600 ते 1000, नाकेश्वर 1500 ते 2500, हिंग 400 ते 700, काळी मिरी 600 ते 900, शहाजीरे 700 ते 1200, रामपत्री 800 ते 1200, जायपत्री 2200 ते 3000, हिरवी वेलची 1800 ते 2500, जायफळ 1000 ते 1200, हळकुंड 140 ते 180, धोंड फूल 600 ते 1000, मीठ मोठे 10 ते 15, तमालपत्री 100 ते 120, गूळ 50 ते 55 किलोचा दर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.