Home /News /maharashtra /

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांवर ईडीची सर्वात मोठी कारवाई, जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन जप्त

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांवर ईडीची सर्वात मोठी कारवाई, जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन जप्त

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे.

जालना, 24 जून : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती. याशिवाय खोतकर यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता ईडीने खूप मोठी कारवाई केली आहे. ईडीने खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे. शिवसेनेसाठी हा खूप मोठा फटका आहे. कारखान्याच्या जमीनीचा जो व्यवहार झाला आहे त्यामध्ये अनियमितता आढळल्याचा आरोप आहे. याच आरोपांप्रकरणी संबंधित कारवाई करण्यात आली आहे. राज्यात एकीकडे राजकीय भूकंप सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेच्या आणखीन एका नेत्यावर ईडीने कारवाईचा बडगा उचलत खळबळ उडवून दिली. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखान्यावर ED कडून  जप्तीची कारवाई करण्यात आलीय. सदर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आलीय. या कारवाई अंतर्गत कारखान्याची जमीन आणि तेथील यंत्रसामुग्री ED ने जप्त केलीय. (शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' विधानावर दिलं स्पष्टीकरण) काही महिन्यांपूर्वी देखील ED ने या कारखान्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवासस्थानी दोन दिवस छापेमारी केली होती. दरम्यान, आता अचानक झालेल्या या जप्तीच्या कारवाईमुळे एकच  खळबल माजली असून खोतकर सध्याला मुंबईला आहेत. या कारवाई बाबत आम्हाला काही माहीत नाही, संस्थेला अधिकार आहेत कारवाईचे त्यांनी कारवाई केली. आम्ही यासंदर्भात न्यायालयात दाद मागू, असं खोतकर यावेळी म्हणाले. दरम्यान, या कारवाईमुळे खोतकर-दानवे वाद पुन्हा चिघळणार असून ED चा धाक दाखवून थेट भाजप अथवा बंडखोर एकनाथ शिंदे गटाकडे खेचण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली असून खोतकर यांनी मात्र आपण घाबरणार नाही, असं म्हणत यान चर्चेला तूर्तास विराम लावण्याचा प्रयत्न केला. काय आहे प्रकरण? भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. सोमय्यांनी आरोप केल्यानंतर 26 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीचं एक पथक खोतकर यांच्या घरावर दाखल झालं होतं. त्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकरांची कसून चौकशी केली होती. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी खोतकरांची सलग 12 तास चौकशी केली. पण 12 तासांच्या चौकशीनंतरही ईडीच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी पुन्हा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत छापा टाकत कागदपत्रांची पडताळणी केली होती. खोतकरांनी रामनगर साखर कारखाना हा बेनामी खरेदी केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच "अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात घोटाळा तर केलाच पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा गिळंकृत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खोतकरांना ही 100 एकर जागा बिल्डिंग, मॉल्स, कर्मिशिअल कॉम्पलेक्स करण्यासाठी हवी आहे. ही जमीन साखर कारखान्यासाठी देण्यात आली होती. त्या जागेची किंमत 400 कोटी आहे. शासकीय जमीन मिळून संपूर्ण जागा ही जवळपास 240 एकर आहे. त्याची एकूण किंमत 1 हजार कोटी इतकी आहे", असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: ED

पुढील बातम्या