मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आधी ई-मेल हॅक, नंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नग्न फोटो केले व्हायरल, बुलडाण्यातील संतापजनक घटना

आधी ई-मेल हॅक, नंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नग्न फोटो केले व्हायरल, बुलडाण्यातील संतापजनक घटना

या महिला पोलीस कर्मचारीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध विनयभंग तसंच आय टी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे

  • Published by:  sachin Salve

राहुल खंदारे, प्रतिनिधी

बुलडाणा, 24 जुलै : पोलीस म्हटल्यावर भल्याभल्या गुन्हेगारांना घाम फुटत असतो. पण, बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचारीचे (buldhana police) नग्न फोटो सोशल मीडियावर (nude photos) व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा इमेल हॅक ( e-mail hacked) करून हे फोटो याच महिला पोलीस कर्मचारीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा ग्रामीण पोलीस दलात काम करणाऱ्या एका महिला कर्मचारीसोबत हा प्रकार घडला आहे. आरोपीने या महिलेला ई-मेल हॅक केला. त्यानंतर पीडित महिलेनं आपले काही फोटो हे ई-मेलवरील फोल्डरमध्ये ठेवले होते. ई-मेल हॅक झाल्यामुळे आरोपीच्या हाती हे फोटो लागले.

तिसरी वनडे मॅच गमावल्यानंतरही ‘या’ कारणामुळे होतंय कोच राहुल द्रविडच कौतुक

त्यानंतर पीडित महिला कर्मचारीची बदनामी करण्याच्या हेतून 70587 25505 या क्रमांकावरून हे सर्व फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आले आहे. बघता बघता हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले. हे फोटो जेव्हा पीडित महिलेलाच मिळाले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडित महिला पोलीस कर्मचारी असल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

ड्यूटीवर आराम करणाऱ्या डॉक्टरला तरुणीने लगावली कानशिलात; VIDEO तुफान VIRAL

या महिला पोलीस कर्मचारीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध विनयभंग तसंच आय टी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे बुलडाणा जिल्ह्यात महिला पोलीसच सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. या घटनेमुळे बुलडाणा जिल्हा पोलीस प्रशासनाची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली आहेत.

First published: