मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /तिसरी वनडे मॅच गमावल्यानंतरही ‘या’ कारणामुळे होतंय कोच राहुल द्रविडच कौतुक

तिसरी वनडे मॅच गमावल्यानंतरही ‘या’ कारणामुळे होतंय कोच राहुल द्रविडच कौतुक

 भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचं कौतुक होताना दिसून येत आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचं कौतुक होताना दिसून येत आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचं कौतुक होताना दिसून येत आहे.

  कोलंबो, 24 जुलै : भारतीय क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. यामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-1ने खिशात घातली आहे. (Ind vs SL ODI series) पहिले दोन सामने जिंकून आधीच मालिका जिंकलेल्या भारताने तिसरा सामना मात्र तीन विकेट्सनी गमावला होता; मात्र असं असलं, तरीही भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचं कौतुक होताना दिसून येत आहे.

  याचं कारण म्हणजे, या सामन्यामध्ये भारताच्या तब्बल पाच खेळाडूंनी पदार्पण केलं होतं. (India ODI team new faces) यामुळेच पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी राहुल द्रविड यांचं कौतुक केलं आहे. आपल्या यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून राजा यांनी म्हटलं आहे, ‘तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाच नव्या खेळाडूंना संधी देणं ही खूप चांगली गोष्ट होती. (Team India ODI debut) मॅनेजमेंटने घेतलेला हा निर्णय अतिशय चांगला होता.

  बऱ्याच क्रिकेट टीम मालिका जिंकल्यानंतरही पुढच्या सामन्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत नाहीत. पुढचे सामने हरण्याच्या भीतीने असे निर्णय टाळले जातात; मात्र राहुल द्रविड प्रशिक्षक असल्यामुळे असं काही झालं नाही आणि होणारही नाही. द्रविड यांची काम करण्याची पद्धत इतरांहून वेगळी आहे. ते जिंकण्याबाबत किंवा हरण्याबाबत जास्त काळजी करत नाहीत. मालिका अगोदरच जिंकल्यामुळे मॅनेजमेंटकडून बेंच स्ट्रेंग्थ तपासण्याचे निर्देश त्यांना मिळाले असावेत, जेणेकरून नव्या खेळाडूंना संधी मिळेल आणि भारतीय क्रिकेटची प्रगती होईल.’

  हे ही वाचा-IND vs SL: राहुल द्रविडच्या 'त्या' निर्णयावर गावसकरांची टीका, म्हणाले...

  एकाच सामन्यात तब्बल पाच खेळाडूंनी पदार्पण करण्याची घटना भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात संजू सॅमसन, नीतिश राणा, चेतन सकारिया, कृष्णप्पा गौतम आणि राहुल चहर या पाच खेळाडूंनी वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. यापूर्वी, 1980मध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमजीसी) खेळल्या गेलेल्या वन डे मॅचमध्ये पाच भारतीय खेळाडूंनी एकत्र डेब्यू केलं होतं. यामध्ये दिलीप जोशी, किर्ती आझाद, रॉजर बिन्नी, संदीप पाटील आणि टी. श्रीनिवासन यांचा समावेश होता.

  दरम्यान, टी-20 मॅचेसमध्ये तब्बल सहा वर्षांपूर्वीच पदार्पण केलेल्या संजू सॅमसनला (Sanju Samson ODI debut) अखेर वन डे मॅचेसमध्ये संधी मिळाली आहे. राहुल चहरलाही (Rahul Chahar ODI debute) जवळपास दोन वर्षांनंतर ही संधी मिळाली आहे.

  First published:

  Tags: Cricket, Cricket news, India Vs Sri lanka, Rahul dravid