एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाती बातमी आहे. एमपीएससीने परीक्षेबाबत महत्वाची घोषणा केली आहे. यावर्षी मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 14 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. आधी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीचं (Coronavirus Pandemic) कारण देत ही परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पुण्यात mpsc च्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून आंदोलन पुकारले आहे.