मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ड्रायव्हरला झोप लागली, गाडीवरील नियंत्रण सुटलं अन् घडलं भयानक, दोघांचा मृत्यू

ड्रायव्हरला झोप लागली, गाडीवरील नियंत्रण सुटलं अन् घडलं भयानक, दोघांचा मृत्यू

राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्याही घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 30 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस अपघाताची घटना समोर आली आहे. त्यातच आता साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातामध्ये 2 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. तर 5 गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये एका दीड वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

सराफ कुटुंबीय पुण्यातील राहणार आहे. चालकाला झोप लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. गोकर्ण महाबळेश्वर कडुन‌ ट्रीप संपवुन पुण्याला जात असताना हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये 2 व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. तर 5 गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये एका दीड वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. जखमींना शिरवळच्या जोगळेकर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - मुलाच्या वयाच्या तरुणासोबत अफेयर, समजावूनही महिलेने ऐकले नाही, पतीने तिचा विषयच संपवला!

भरधाव एसटीत अचानक चालकाला फिट आली अन्..

एसटी बस चालवताना चालकाला फीट आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. यानंतर मात्र, चालकाने प्रसंगावधा राखत एसटी बसमधील 40 हुन अधिक प्रवासी बचावले आहे. खेड आगारातून शिरगाव येथे जाणाऱ्या एसटी बस चालकाला मुंबई गोवा महामार्गावर खोपी फाटा या ठिकाणी अचानक फीट आली. खोपी फाटा स्टॉपवर गाडी सुरू असताना फीट आल्याने प्रवासी घाबरले होते. मात्र, प्रसंगावधनाने बस रस्त्याच्या बाजूला थांबवल्याने अनर्थ टळला. दरम्यान, बस चालकाला तत्काळ रुग्ण वाहिकेने कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

First published:

Tags: Accident, Road accident, Satara, Satara news