बीड, 27 डिसेंबर: एखाद्याकडे चार-चार खाती (Multiple portfolios) असती, तर समजू शकलो असलो, पण सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Minister of Social Justice Dhananjay Munde) यांच्याकडे एकच खातं असूनही त्यांना प्रश्न सोडवता येत नाहीत, अशी टीका भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Dr. Pritam Munde) यांनी केली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर पंकजांनी चौफेर टीका करत त्यांना लक्ष्य केलं. परळी शहरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून डॉ. प्रीतम मुंडे चांगल्याच संतापल्याचं दिसलं.
काय आहे प्रकरण?
परळी शहरात गेल्या चार दिवसांपासून बार्टीच्या विद्यार्थ्यांचं साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणावर तोडगा निघत नसल्यामुळे आक्रमक पवित्रा घेतलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्यांचे बंधू आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांनी अगोदर आपल्या खात्याचे प्रश्न सोडवावेत आणि नंतर बीडच्या रेल्वेकडं लक्ष दयावं, असं टोलाही त्यांनी लगावला.
उपोषणस्थळी दिली भेट
परळी येथे सुरू असलेल्या बर्टीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी डॉ. प्रीतम मुंडे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यावेळी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग हा मंत्री धनंजय मुंडे यांचा असून ते या खात्याचे मंत्री असल्याचं त्यांनी सांगितलं. जर हा प्रश्न धनंजय मुंडे सोडवू शकत नसतील तर आम्ही हा प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लावू. मात्र धनंजय मुंडे यांनी आपल्या खात्याचे प्रश्न सोडवण्याऐवजी बीड रेल्वेच्या प्रश्नात लक्ष घालत बसू नये, असा खोचक टोलादेखील त्यांनी लगावला.
हे वाचा -
मुंडे विरुद्ध मुंडे
डॉ. प्रीतम मुंडे या भाजपच्या खासदार असून केंद्रात भाजपचे सरकार आहे. तर धनंजय मुंडे हे राज्यात मंत्री आहेत. हे बहीण आणि भाऊ एकमेकांच्या सरकारांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचं गेल्या दिवसांत दिसून येत आहे. केंद्राच्या अखत्यारित असणाऱ्या रेल्वेचा प्रश्न धनंजय मुंडेंनी उपस्थित केला होता. त्यावर धनंजय मुंडेंनी त्यांच्या खात्यात लक्ष द्यावं, असा सल्ला देत डॉ. प्रीतम मुंडे यांनी त्याची परतफेड केल्याची चर्चा बीड जिल्ह्यात रंगली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Dhananjay munde, Parli