उल्हासनगर, 07 ऑगस्ट : चक्क शिवसेना (shivsena) महिला सभापतीच्या दालनात धमकीचे पत्र आल्याने उल्हासनगर महापालिका मुख्यालयात (ulhasnagar municipal corporation) एकच खळबळ उडाली आहे. शिक्षण समिती सभापती शुभांगी बेहनवाल (Education Committee Chairman Shubhangi Behanwal) यांना हे धमकीचे पत्र चक्क त्यांच्या दालनात आले आहे. हे धमकीचे पत्र कोणी दिला हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सभापती शुभांगी या चार महिन्यापूर्वी पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण समितीच्या सभापतीपदी निवडून आल्या आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी पालिका शाळांची झालेली दुरवस्था आणि विद्यार्थी पटसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने काम सुरू केले. मात्र हे करत असताना शिक्षण मंडळात गेल्या चार वर्षात पालिका शाळांच्या दुरुस्तीसाठी आणि सोयी-सुविधांसाठी किती खर्च करण्यात आला याची माहिती त्यांनी शिक्षण मंडळाकडून पत्राद्वारे मागवली होती.
लुटारू वधूला अटक; लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पैसे आणि दागिने घेऊन करायची पोबारा
मात्र, गेल्या एक महिन्यापासून ही माहिती देण्यात चालढकल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी त्या आपल्या दालनात आल्यानंतर त्यांच्या टेबलवर “जास्त चौकशी करू नका, नाहीतर तुमचा पण मनोज शेलार करावा लागेल” अशा आशयाचे धमकीचे पत्र त्यांच्या टेबल वर ठेवले होते, ते त्यांच्या हाती लागले.यानंतर मात्र पालिका मुख्यालयात एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत त्यांना ही माहिती दिली. सध्या पालिकेतील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षी या शिक्षण मंडळाची माहिती महाराष्ट्र नव निर्माण विद्यार्थी सेनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी मागवली होती. त्यावेळी शेलार यांच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यात ते थोडक्यात बचावले होते. या हल्ल्या प्रकरणी महापालिकेतील अधिकाऱ्याला अटक देखील झाली होती.
खुलेआम AK-47 रायफल घेऊन फिरत होती महिला; Video समोर आल्यानंतर पोलीस अलर्ट
दरम्यान, शेलार यांचे नाव घेऊन त्यांचा पत्रात उल्लेख करण्यात आल्याने शिक्षण विभागात मोठं कारस्थान शिजत असल्याची शंका व्यक्त होत आहे. धमकी देणाऱ्याला लवकर शोधून काढावे अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असं शिवसेनेचे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, गटनेता धनंजय बोढारे यांनी इशारा दिला. तर सध्या सभापती शुभांगी बेहनवाल आणि शिवसेना पदाधिकारी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.