मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Vinayak Mete: रुग्णालयात पोहोचण्याआधीच विनायक मेटेंचं निधन? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Vinayak Mete: रुग्णालयात पोहोचण्याआधीच विनायक मेटेंचं निधन? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांचं रुग्णालयात आणण्याआधीच निधन झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की रुग्णालयात आणल्यानंतर विनायक मेटे यांचा बीपी, प्लस तपासण्यात आलं. (Vinayak Mete Accident)

    मुंबई 14 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी रुग्णवाहिकेनं एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉ.धर्मांग यांनी तपासून मयत घोषित केलं. यावर आता डॉक्टरांनी प्रतिक्रिया दिली आहे. vinayak mete : अपघातात जखमी विनायक मेटेंना हॉस्पिटलमध्ये आणलं, कशामुळे झाला मृत्यू? फडणवीसांनी सांगितलं कारण... डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक मेटे यांचं रुग्णालयात आणण्याआधीच निधन झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की रुग्णालयात आणल्यानंतर विनायक मेटे यांचा बीपी, प्लस तपासण्यात आलं. तसंच त्यांच्या हृदयाचे ठोकेही तपासले गेले, मात्र यातील काहीही सुरू नव्हतं. त्यामुळे रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. विनायक मेटे यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे, घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यताही डॉक्टरांनी वर्तवली आहे. मात्र, याबद्दलचं पूर्ण सत्य शवविच्छेदनानंतरच समोर येईल, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान विनायक मेटे यांच्यासोबत अपघातावेळी गाडीमध्ये असलेले पोलीस हवालदार राम ढोबळे यांची प्रकृतीही गंभीर आहे. तर, चालकाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. Vinayak Mete Biography : मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता हरपला, विनायक मेटेंचा प्रवास थक्क करणारा प्रवास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,विनायक मेटे हे फोर्ड Endeavour MH 01 DP 6364 या कारने प्रवास करत होते. चालक एकनाथ कदम हे विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांना घेऊन मुंबई बाजूकडे दुसऱ्या लेनने जात होते. पण कार चालकाचा त्यांच्या गाडीवरील ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे. चालकाला झोपेची डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Accident, Vinayak mete

    पुढील बातम्या