मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /भयंकर! राज्यात महिन्याभरात तब्बल 21658 रुग्णांचा मृत्यू; सरासरी दररोज 721 मृत्यूची नोंद

भयंकर! राज्यात महिन्याभरात तब्बल 21658 रुग्णांचा मृत्यू; सरासरी दररोज 721 मृत्यूची नोंद

महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत असताना मृतकांचा आकडा मात्र वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत असताना मृतकांचा आकडा मात्र वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत असताना मृतकांचा आकडा मात्र वाढताना दिसत आहे.

मुंबई, 15 मे: महाराष्ट्रात कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्ण वाढीला ब्रेक लागला असल्याने दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे मात्र मृतकांच्या आकडेवारीने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. कारण, राज्यात महिन्याभरात तब्बल 21 हजार 658 रुग्णांचा मृत्यू (21658 covid patients death) झाला आहे. महिन्याभरात इतक्या मोठ्या संख्येत कोरोना बाधित मृतकांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकारच्या (Maharashtra Government) चिंतेत आणखी भर पडली आहे.

सरासरी दररोज 721 मृत्यू

राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे लक्षात येते की, राज्यात 15 एप्रिल ते 15 मे या एका महिन्याच्या कालावधीत तब्बल 21 हजाक 658 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ या एक महिन्याच्या कालावधीत सरासरी दररोज 721 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतकांच्या या संख्येमुळे केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाचीही चिंता वाढली आहे.

वाचा: VIDEO: नाशकात नगरसेविकेच्या पतीचा राडा; थेट रुग्णालयातच घुसवली कार

राज्यातील रिकव्हरी रेट वाढतोय

आज राज्यात 59,073 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 47,67,053 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 89.2 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 34,848 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात 4,94,032 सक्रिय रुग्ण आहेत.

आज राज्यात 960 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 960 मृतकांपैकी 371 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 188 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 401 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीच आहेत. राज्यातील सध्याचा मृत्यू दर 1.51 टक्के इतका आहे.

First published:

Tags: Coronavirus, Maharashtra