औरंगाबाद, 25 ऑक्टोबर : यंदा भाऊबीज 26 ऑक्टोबर साजरी होणार आहे. भाऊबीज हा बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा सण आहे. प्रत्येक भाऊ-बहिण या दिवसाची वाट पाहत असतात. भाऊबीजच्या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते. तर भाऊ आपल्या लाडक्या बहिणीसाठी सुंदर गिफ्ट देतो. मात्र, हल्ली फक्त भाऊ बहिणीला गिफ्ट देत नाही तर बहिणही भावाला गिफ्ट देते. त्यामुळे या भाऊबीजीसाठीच औरंगाबाद शहरातील बाजारपेठेत मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी बुद्धीला चालना देणारे गिफ्ट बाजारामध्ये उपलब्ध झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मानवाने झपाट्याने प्रगती केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा ज्या पद्धतीने फायदा आहे तेवढाच याचा तोटा देखील आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये टीव्ही आणि मोबाईल आला आणि याचे जेवढे चांगले फायदे होऊ लागले तेवढेच दुष्परिणाम ही समाजामध्ये दिसू लागले आहेत. लहानपणापासूनच मुलांना टीव्ही आणि मोबाईलचे व्यसन जडले आहे. यामुळे अनेक पालक मुलांच्या या सवयीमुळे चिंतेत आहेत. मुलांचे टीव्ही आणि मोबाईलचे व्यसन सोडवण्यासाठीच औरंगाबाद शहरातील तुलसी गिफ्ट सेंटरमध्ये भाऊबीज निमित्त विशेष गिफ्ट उपलब्ध आहेत. मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी त्यांनी बुद्धीला चालना देणारे गिफ्ट उपलब्ध करून दिले आहेत. हेही वाचा : Video : नागपुरात अवतरली शिवसृष्टी, दिवाळीत साकारला ‘प्रतापगड’ मुलांसाठी हे गिफ्ट उपलब्ध आहेत बुद्धीला चालना देणाऱ्या गेम्समध्ये बिजनेस गेम, लुडो क्रॉसवर्ड, वर्ल्ड ऑफ सायन्स, सम जिनियास, मॅग्नेटिक गेम्स, ए वन, प्ले बुक, ॲनिमल ट्रेन, कलर ट्रॅक, जम्बो मॅप, मॅग्नेटिक पझल्स, मेकॅनिक सायंटिस्ट, ड्रीम कॅचेर, वाइल्ड गेम्स,पझल्स, लेट्स लर्न कंट्री, लेट्स अल्फाबेट्स, वर्ल्ड बिल्डिंग, बेबीज स्नोकर, मॉन्स्टर, फिंगर पेंटिंग, थ्रीडी लुडो, बास्केटबॉल सुपर शॉट, कॅन्डल कोट्स, लिंक डिझायनर, इंटरनॅशनल बिझनेस, जिंगल्स, डॉवेडिंग इत्यादींचा समावेश आहे. मुलींसाठी हे गिफ्ट आहेत उपलब्ध डॉल हाऊस, पेपर क्विलिंग, कॅनव्हास आर्ट, स्टाईल स्पार्किट, पेपर फँटॅस्टिक, क्ले सेट, ड्रीम कॅचेर, मेमोरी स्टोरी, फिंगर पेंटिंग,डॉट पेंटिंग किट, कॅनव्हास आर्ट, पेपर वेडिंग इत्यादीं. या गिफ्ट ची किंमत 150 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत आहे. हेही वाचा : अंबाबाईच्या दर्शनाने करवीरवासियांची दिवाळीची सुरुवात, दर्शनासाठी लांबच लांब रांगा VIDEO प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार या ठिकाणी गिफ्ट उपलब्ध आहेत. वयोगटाच्या नुसार प्रत्येक वयोगटाला उपयोगी पडेल असं गिफ्ट या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता. भाऊबीज निमित्त तुमच्यासमोर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध आहेत, असं तुलसी गिफ्ट सेंटर मधील कर्मचारी श्रेया गाडवे यांनी सांगितले दिवाळी आणि भाऊबीज मध्ये प्रत्येक जण एक दुसऱ्याला गिफ्ट देत असतो. यामध्ये अनेक हे अनावश्यक गिफ्ट असतात. मात्र मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी आमच्याकडे स्पेशल गिफ्ट उपलब्ध आहेत. ज्यामुळे मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल, असं तुलसी गिफ्ट सेंटर मालक आदित्य मालानी यांनी सांगितले .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.