• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Diwali 2021 : धनत्रयोदशीला होणार सोनारांची चांदी! विक्रमी सोनं विक्री होण्याची शक्यता

Diwali 2021 : धनत्रयोदशीला होणार सोनारांची चांदी! विक्रमी सोनं विक्री होण्याची शक्यता

सोनं विक्रीचा (Gold trade) गेल्या 40 वर्षांतील विक्रम यावर्षी धनत्रयोदशीला (Diwali 2021) मोडला जाईल अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:
मुंबई, 25 ऑक्टोबर : धनत्रयोदशीच्या (Dhanteras) दिवशी आपल्याकडील धनाची पूजा केली जाते. याच दिवशी सोनं-चांदी खरेदी (Gold-Silver Shopping) करण्यालादेखील प्रचंड महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी केल्यास आपली भरभराट होते, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी आणि विक्री केली जाते. सराफ बाजारात या दिवशी मोठी धामधूम असते. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील सोनं खरेदी जोमात होणार असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इतकचं नाही तर सोनं विक्रीचा गेल्या 40 वर्षांतील विक्रम यावर्षी मोडला जाईल अशी देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी 2 नोव्हेंबरला (2 November 2021) धनत्रयोदशी आहे. देशभरातील सराफ (Jewelers) बाजारांमध्ये धनत्रयोदशीची जोमात तयारी करून ठेवली आहे. यावर्षी दसरा आणि नवरात्रीतही मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री (Gold Sale) झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) दिलेल्या माहितीनुसार दसऱ्याला सोने विक्रीचा गेल्या 20 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. हे पाहता धनत्रयोदशीला देखील 40 वर्षांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र मोठ्या प्रमाणात सोने विक्री होईल, असं मत आयबीजेएनं व्यक्त केलं आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे जवळपास 18 महिन्यांनंतर बाजार पूर्वपदावर येऊ लागला आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होताच बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सोन्याच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली आहे. देशभरातील सराफ बाजारांमध्ये धनत्रयोदशीची प्रचंड उत्सुकता आहे. त्यांना विश्वास आहे की यावेळी सोने विक्रीचा नवीन विक्रम प्रस्थापित होईल. Gold Price Today : सोनं आज पुन्हा महागलं; काय आहेत नवे दर? यावेळी सोने विक्रीचा 40 वर्षांचा विक्रम मोडला जाऊ शकतो. शिवाय सोन्याच्या दरात (Gold Price) वाढ देखील होऊ शकते, अशी माहिती इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष कुमार जैन यांनी दिली आहे. गेल्या 18 महिन्यांपासून लोक त्यांच्या घरातच थांबले आहेत. त्यामुळं प्रवास, रेस्टॉरंटमध्ये खाणं आणि कार्यक्रमांसाठी होणारा खर्च देखील वाचला आहे. परिणामी पैशांची बचत झाली आहे. सोबतच यावेळी धनत्रयोदशीच्या काळात कोरोनाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता असल्याने लोक बचतीचे पैसे इकडे-तिकडे न खर्च करता सोने खरेदीसाठी लावतील. याशिवाय सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. ज्या घरांमध्ये पुढील एक-दोन महिन्यात लग्नकार्ये आहेत असे लोक धनत्रयोदशीलाही सोने खरेदी करतील. अशाप्रकारे सोन्याची विक्रमी विक्री होऊ शकते, असं देखील कुमार जैन म्हणाले. दिल्ली बुलियन असोसिएशनचे जयकिशन चांदीवाले सांगतात की, ज्वेलर्सनी धनत्रयोदशीसाठी जय्यत तयारी केली आहे. सण आणि लग्नांचा हंगाम एकत्र येत असल्याने सोन्याच्या विक्रीत मोठी वाढ होणार आहे. याशिवाय धनत्रयोदशीसाठी अनेकांनी आगाऊ बुकिंग केलं आहे. अनेक ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदीची तयारी केली आहे, अशी माहिती गाझियाबादमधील संत ज्वेलर्सचे मोहित सोनी यांनी दिली. Rakesh Jhunjhunwala यांची 'या' रियल्टी स्टॉकमध्ये गुंतवणूक, वर्षभरात 225 टक्क्यांचे रिटर्न्स गेल्या वर्षी झाली होती 40 टन सोनं विक्री इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 2020 मध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर 40 टन सोन्याची विक्री झाली होती. 2019 च्या तुलनेत ही आकडेवारी 30 टक्क्यांनी जास्त होती. या 40 टन सोन्याची किंमत जवळपास 20 हजार कोटी होती. तर 2019 मध्ये 12 हजार कोटी रुपयांची सोने विक्री झाली होती. यंदा त्यापेक्षा कितीतरी पट अधिक विक्री होण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना प्रतिबंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळं बाजारपेठा पूर्णपणे खुल्या झाल्या आहेत. परिणामी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी नक्कीच जास्त सोने खरेदी-विक्री होईल यात शंका नाही.
First published: