लातूर, 24 मे: मुंबईहून ट्रक घेऊन आलेल्या एका व्यक्तीला होम क्वारंटाईन व्हावं लागेल असं सांगण्यात आलं. मात्र, त्याचा राग येऊन संतापलेल्या ड्रायव्हरनं अंगणात झोपलेल्या पाच जणांवर लोखंडी रॉडनं हल्ला केला. याच दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा.. अखेरचा प्रवासही वेदनादायी, अन्न-पाण्यावाचून मजूर तरुणाचा असा झाला शेवट!
मुंबईहून आल्यानंतर गावात गाडी का लावली, असा जाब विचारल्यामुळे निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे रविवारी पहाटे हे हत्याकांड घडल्याची माहिती मिळालीआहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी फरार असून त्याचा शोध घेत आहेत.
नेहमी मुंबईला राहणारा व नुकताच गुजरातहून ट्रक घेऊन निलंगा तालुक्यातल्या बोलेगाव येथे आलेल्या एका व्यक्तीला होम क्वारंटाईन व्हावे लागेल, असे सांगितल्याने वाद निर्माण झाला. त्यात नातेवाईकांत तुंबळ हाणामारी होऊन दोघांचा खून झाला.
विद्यमान बरमदे असं आरोपीचं नाव आहे. आरोपी नेहमी मुंबईला वास्तव्याला असतो. तो ट्रॅक घेऊन गुजरातहून आला अशी माहिती कळल्याने बोळेगावातील (ता. निलंगा) पुढाकार घेणारे शत्रुघ्न पाटील यांनी विद्यमान बरमदे यास होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. त्यावरुन बरमदे व पाटील यांच्यात वाद झाला.
हेही वाचा.. मठाधिपतीच्या हत्याकांडाने नांदेड हादरलं, मठात घुसून सेवेकऱ्याचीही निर्घृण हत्या
दरम्यान बरमदे यांची बहीण शेजारील चांदोरी गावात राहते. तो तिथे गेला. नंतर पहाटे बरदरे यांच्यासह सहा जण पुन्हा बोळेगावात आले. अंगणात झोपलेल्या पाच जणांवर त्यांनी लोखंडी रॉडनं हल्ला केला. त्यात फिर्यादी शत्रूघ्न पाटील यांचे वडील शहाजी पाटील व त्यांचा पुतण्या वैभव पाटील जागेवर ठार झालेत. तर शत्रुघ्न पाटील यांच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत बरमदे यासह सहाजण आरोपी असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कासारशिरसी पोलिसांत सुरु आहे. आरोपी सध्या फरार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.