जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एका बकऱ्यावरून वातावरण तापलं, दंगल नियंत्रण पथक रवाना ; ठाण्यात नेमकं काय घडलं?

एका बकऱ्यावरून वातावरण तापलं, दंगल नियंत्रण पथक रवाना ; ठाण्यात नेमकं काय घडलं?

बकऱ्यावरून राडा

बकऱ्यावरून राडा

मिरा रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Mira-Bhayandar,Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 28 जून, प्रतिनिधी : मिरा रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मिरा रोड पूर्वेच्या जेपी इन्फ्रा कॉम्प्लेक्समध्ये बकऱ्यावरून जोरदार राडा झाला आहे. एका व्यक्तीला   सोसायटीमध्ये बकरा घेऊन येण्यासाठी सुरक्षा रक्षकानं विरोध केला. त्यानंतर सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी खाली उतरत बकरा आणण्यास विरोध केला. यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी  दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण केलं. सोसायटीमधील नागरिकांचा विरोध  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मिरा रोड पूर्वेच्या जेपी इन्फ्रा कॉम्प्लेक्समध्ये मोहसीन शेख नावाची व्यक्ती सोसायटीमध्ये बकरा घेऊन आली. मोहसीन शेख यांना सोसायटीमध्ये बकरा घेऊन येऊ नका म्हणत सुरक्षा रक्षकानं विरोध केला. त्यानंतर सोसायटीमधील नागरिकांनी देखील याला विरोध केला. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. रहिवाशी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण  सुरू केलं.

Pune Crime: प्रेमसंबंधास नकार, विवाहितेने बॉयफ्रेंडला पुण्यातून केलं किडनॅप, गुजरातला हॉटेलवर नेऊन..

  पोलिसांकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न  घटनेची माहिती मिळताच काशिमिरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र स्थानिक आपल्या मागणीवर ठाम असल्यानं वाद आणखी चिघळला. खबरदारी म्हणून पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आलं आहे. परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.  स्थानिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर देखील या प्रकरणात अद्याप तोडगा निघालेला नाही. नागरिक आपल्या मागणीवर ठाम आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात