अमरावती, 18 एप्रिल: अमरावतीच्या अचलपूरमध्ये (Achalpur of Amravati) झेंडा लावण्या वरून दोन गटात राडा झाला आहे. दोन गटात वाद आणि दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. अचलपूर शहरातील दुल्हा गेटवर (Dulha Gate) झेंडा फडकवल्यामुळे दोन गटात तणाव निर्माण झाला. सद्यपरिस्थितीत अचलपूर आणि परतवाडा शहरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे. रविवारी रात्रीची ही घटना असून पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. जमावाने पोलिसांच्या दिशेने ही दगडफेक केली या दगडफेकीत एक पोलिस कर्मचारी जखमी असल्याची माहिती आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून संपूर्ण अचलपूर शहरात तसेच परतवाडा येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. देशात भोंगे प्रकरण पेटलं, शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या.. देशविदेशातील TOP बातम्या एका क्लिक वर पोलीस बंदोबस्तासाठी तीन SRPFच्या कंपन्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अमरावती ग्रामीणचे 150 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तर अकोला येथील 100 अधिकारी आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. नेमकी काय घडली घटना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरातील झेंडा काढल्याचा वादावरून दोन समुदाय पुढे आल्याने तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला. तर घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिसांनी अचलपूर परतवाडा या दोन्ही जुळ्या शहरात संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी विनाकारण बाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यादरम्यान दोन्ही गटात दगडफेक झाली असून काही वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे. तर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अश्रूधूर सुद्धा सोडण्यात आलं. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर…नाशिक पोलीस आयुक्तांचा वादग्रस्त आदेश याप्रकरणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून 16 जणांना अटक करण्यात आलेली आहे. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अचलपूर शहरामध्ये शांतता आहे. शहरात केवळ रस्त्यावर पोलीस असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याच आवाहन करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरू नये म्हणून सोशल माध्यमांवर बंदी टाकण्यात आलेली आहे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.