Home /News /nashik /

#Hanumanchalisa भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर...Nashik Police आयुक्तांचा वादग्रस्त आदेश

#Hanumanchalisa भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर...Nashik Police आयुक्तांचा वादग्रस्त आदेश

3 मे पर्यंत भोंगे बंद झाले नाहीत तर जशास तसे उत्तर देणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर येते. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

नाशिक,18 एप्रिल: सध्या राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंग्याचा विषय केलेल्या घोषणेनंतर एकच वाद सुरु झाला आहे. 3 मे पर्यंत भोंगे बंद झाले नाहीत तर जशास तसे उत्तर देणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर येते. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. मुस्लिम धर्मियांनी देखील भोंग्यांची परवानगी घ्यावी. अजाणपूर्वीं 15 मिनिटं आणि 100 मीटर लांब हनुमान चालीसा लावता येईल, असे आदेश काढण्यात आला आहे. नाशिकमधील 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार असल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत. तसंच त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याचंही त्यात नमूद केलंय. इतकंच काय तर पोलीस आयुक्तांनी नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण न करण्याचा इशाराही दिला आहे.  जोतिबाच्या नावानं चांगभलं! बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसाचा 'तो' Video Viral मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही, असं नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आदेश दिला आहे. त्याशिवाय, कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. सर्वच धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार, असल्याचं त्यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे. दरम्यान नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशाचं मनसेनं स्वागत केलं आहे. आयुक्तांच्या निर्णयाचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया नाशिकचे मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी दिली आहे. नाशिक आयुक्त दीपक पांडे यांचा वादग्रस्त आदेश - 3 मे पासून आदेश लागू - सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांसाठी ही परवानगी आवश्यक - मंदिर,मस्जिद,चर्च, गुरुद्वारा यांना लागू - भोंग्यांवर अजानसाठी परवानगी आवश्यक - ज्यांच्याकडे नसेल त्यांनी 3 मे पर्यंत अर्ज करून परवानगी घ्यावी - हनुमान चालीसा पठण करण्यास मनसेला मनाई - अजान पूर्वी आणी नंतर 15 मिनिटं कालावधी आणी 100 मीटर अंतर प्रतिबंधित क्षेत्र - कायदा कोणत्याही धर्मियांनी उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

तुमच्या शहरातून (नाशिक)

Published by:Pooja Vichare
First published:

Tags: MNS, Nashik, Raj Thackeray

पुढील बातम्या