जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / डिझेल टँकरला ट्रकने दिली धडक, पुलावरच उसळला आगडोंब, 3 जण जखमी, VIDEO

डिझेल टँकरला ट्रकने दिली धडक, पुलावरच उसळला आगडोंब, 3 जण जखमी, VIDEO

डिझेल टँकरला ट्रकने दिली धडक, पुलावरच उसळला आगडोंब, 3 जण जखमी, VIDEO

भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भिलेवाडा गावाजवळ असलेल्या एआर पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली

  • -MIN READ Bhandara,Maharashtra
  • Last Updated :

नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 27 एप्रिल : भंडारा जिल्ह्यात भीषण दुर्घटना समोर आली आहे. डिझेल टॅंकरला मागून ट्रकने जोराची धडक दिली. त्यानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतला. या भीषण अपघातात तीन जण भाजल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भिलेवाडा गावाजवळ असलेल्या एआर पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही ट्रक जळालेले आहेत तर तीन जण भाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जाहिरात

भंडारा कडून लाखनीच्या दिशेला जात असलेल्या डिझेल टँकरला मागून दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने डिझेल टॅंक सह दोन्ही ट्रक जळालेले आहेत. हा थरार पाहता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली आहे. (mumbai pune expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर विचित्र अपघात, 11 गाड्यांचा चुराडा, घटनास्थळाचे PHOTOS) दोन्ही ट्रकमध्ये असलेले जवळपास तीन लोक भाजले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे. सध्या घटनास्थळावर अग्निशमन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कल्याणमध्ये भीषण अपघात, ब्रेक फेल झालेली बस गाड्यांवर पडली दरम्यान, कल्याणमध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे ही बस पार्क केलेल्या गाड्यांवर पडली. गोदरेज हिल्सच्या मलबेरी सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये बस ड्रायव्हर जखमी झाला आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पार्क केलेल्या पांढऱ्या मर्सिडिजचं मोठं नुकसान झाल्याचं दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात