बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव 09 जून : क्रूर सीरियल रेपिस्ट आरोपीस आजन्म कारावास / जन्मठेपेची शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावला आहे. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांच्या कोर्टाने ही शिक्षा सुनावली, अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंकुश वडणे असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव असून त्याने आजवर 4 अल्पवयीन मुलींवर आणि इतर 3 महिलांवर अत्याचार असे 7 गुन्हे केले आहेत. त्याला 2 वेळेस कोर्टाने यापूर्वी शिक्षा सुनावली आहे, तर 3 प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. शिक्षा भोगून आला की तो पुन्हा लहान मुलींवर बलात्कार करायचा. यापूर्वी त्याने 4, 8, 10 आणि 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. तुळजापूर येथील एका गावात 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना 30 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. गावकऱ्यांनी त्यावेळी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. शवविच्छेदन अहवाल हादरवणारा, अल्पवयीन मुलीसोबत जे घडलं त्याची कल्पनाही करणं शक्य नाही अटक करण्यात आलेला तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील आरोपी अंकुश वडणे हा लहानपणीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. तो कधी अंकुश शिंदे तर कशी अंकुश सरवदे अशी नावे सांगत बलात्कारसारखे कांड करायचा. आरोपी अंकुश याने तो 15 वर्षाचा असताना पहिला गुन्हा 2002 साली केला त्यात त्याला बालसुधारगृहात टाकण्यात आलं. त्यानंतर त्याची 2007 मध्ये सुटका करण्यात आली. सुटून आल्यावर त्याने 2009 साली पुणे येथील खडकी येथे 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. तेव्हा त्याला पोस्को अंतर्गत 10 वर्षाची शिक्षा झाली. ती शिक्षा भोगून तो 5 नोव्हेंबर 2016 रोजी बाहेर आल्यावर त्याने 7 महिन्यात 2 जून 2017 मध्ये पुन्हा सोलापूर येथे 8 वर्षीय मुलीवर बलात्कार केला, त्याचवर्षी त्यानी 2 मुलींचे अपहरण आणि एक विनयभंग असे 3 गुन्हे केले. 2017 साली त्याला 6 वर्षाची शिक्षा झाली. ती शिक्षा भोगून तो 30 एप्रिल 2022 रोजी बाहेर आला. त्यानंतर अवघ्या 4 महिन्यात त्याने 30 ऑगस्ट 2022 रोजी 6 वर्षीय मुलीवर बलात्कार केला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.