बीड 09 सप्टेंबर : बीडच्या परळीत नाथ प्रतिष्ठान आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात निवृत्ती महाराज इंदुरीकर कॅमेरा वाल्यांवर चांगलेच संतापले. ‘उतर खाली..तो कॅमेरा काढून टाक..जिरवली तुम्ही आमची’, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी कॅमेऱ्यावरून चांगलाच संताप व्यक्त केला. तर यावेळी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी समोर बसलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करत महाराजांना शांत केलं. देवीच्या जागणारासाठी विकली 3 एकर जमीन, मग घडलं असं काही की बोलवावे लागले पोलीस गणपती उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडल्यानंतर नाथ प्रतिष्ठानने रात्री इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ठेवले होते. यावेळी कीर्तन करण्यासाठी इंदुरीकर महाराज उभे राहिल्यानंतर कॅमेरा पाहताच ते संतापले. ‘ऐ उतर रे खाली..तो कॅमेरा काढ…जिरवली तुम्ही आमची..ते अगोदर खाली काढ..काढून घे अगोदर’ असं इंदुरीकर म्हणू लागले. इतक्यात एकाने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा संताप अधिकच वाढला.. ते म्हणाले ‘अहो ते 2 तास कीर्तन युट्यूबला दाखवण्याचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र ते पूर्ण कधीच युट्यूबला टाकणार नाहीत.. इकडचं एक वाक्य आणि तिकडचं एक वाक्य घेणार. वेगळाच अर्थ लावून दुसऱ्याला इज्जत घालवणार’. udayanraje vs shivendraraje : उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचा वाद आता कडेलोटापर्यंत, शिवेंद्रराजेंनी कडेलोट करण्याची केली भाषा हे प्रकरण वाढतच गेल्याने धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी केली. ते म्हणाले, की महाराज आठ दिवस कार्यक्रम थेट युट्युबवर प्रदर्शित केला आहे, मग नेमका इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम थेट दाखवला नाही, तर त्याची काय परिस्थिती होईल याचा आमच्या सारख्याला विचार करावा लागतो. त्यांना जो व्यवसाय करायचा आहे, तो करू द्या. आपण आपली कामं करू, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी केली. दरम्यान गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पहिल्या दिवसापासून बीडच्या परळी येथील धनंजय मुंडे अध्यक्ष असणारे, नाथप्रतिष्ठान कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून चर्चेत आलं आहे. तर आता पुन्हा एकदा निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी व्यक्त केलेल्या संतापाने हे नाथ प्रतिष्ठान पुन्हा एकदा चांगलेचं चर्चेत आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.