Home /News /maharashtra /

मविआ सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 सुरू, यशवंत जाधव यांना 10 टक्के मिळाले मग 90 टक्के कोणाकडे गेले? : देवेंद्र फडणवीस

मविआ सरकारमध्ये भ्रष्टाचाराची 20-20 सुरू, यशवंत जाधव यांना 10 टक्के मिळाले मग 90 टक्के कोणाकडे गेले? : देवेंद्र फडणवीस

BJP Mahajan Aakrosh Morcha: भारतीय जनता पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात गडचिरोलीत महाजन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

    गडचिरोली, 4 एप्रिल : जनतेच्या सर्व प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधावे यासाठी भाजप (BJP)कडून महाजन आक्रोश मोर्चाला (Mahajan Aakrosh Morcha) सुरुवात करण्यात आली आहे. महाजनआक्रोश मोर्चाची सुरूवात गडचिरोली (Gadchiroli)पासून करण्यात आली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाषण करताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, धानाला बोनस, कृषीपंपाला 24 तास वीज, वीजतोडणी बंद करणे, कर्जमाफी आणि अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी, अवकाळी, अतिवृष्टी, वादळ, किडीची मदत तत्काळ देण्यात यावी, नवाब मलिक यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशा विविध 16 मागण्यांसाठी हा मोर्चा आहे. वाचा : विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ आक्रमक, संतप्त पालकांची शाळेवर दगडफेक महाजनआक्रोश मोर्चाची सुरूवात गडचिरोलीपासून आहे कारण, गडचिरोलीपासून बुलंद होणारा आवाज हा क्रांती घडवितो. या महाविकास सरकारमध्ये भ्रष्टाचाराची ट्वेंटी-ट्वेंटी सुरू आहे. मुंबईतील बिल्डरांचा कर थकला आहे, हिंमत असेल तर तो वसुल करा. त्यांच्याकडून मालपाणी मिळते, म्हणून तेथे ढिल आणि आमच्या शेतकर्‍यांकडून जुलमी वसुली सुरू आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दारूच्या लायसन्सवरील फी 50 टक्क्यांनी कमी केली. विदेशी दारू वरचा टॅक्स कमी करण्याचं काम या सरकारने केलं. या महाराष्ट्रात बेवड्यांचं सरकार आलं, त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही त्यांना बेवड्यांची चिंता जास्त आहे आहे. विदेशी दारुवर कर अर्धा केला. पण, शेतकर्‍यांना कोणतीही मदत केली नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोरोनाच्या 24 महिन्यांच्या काळात मुंबईत शिवसेनेच्या स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी 38 प्रॉपर्टीची खरेदी केली. ज्याची किंमत कमीत कमी 400 कोटी रुपये इतकी आहे. म्हणजे एकट्या मुंबई मनपाचा एक अध्यक्ष 400 कोटींची पॉपर्टी घेतो. त्याला कुणीतरी विचारलं तर तो म्हणतो मला तर फक्त 10 टक्केच मिळले, 90 टक्के बाकी खाऊन गेले. म्हणजे 90 टक्के कुणाकडे गेले आणि ती रक्कम किती होते हे मी सांगायची गरज नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, काय सांगायचे? बांधावर जाऊन 50 हजार देऊ. पण, आज स्थिती काय आहे? 5 हजार रुपये शेतकर्‍यांना द्यायला तयार नाहीयेत. आमच्या पाठित तर सोडा या सरकारने सामान्य माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Gadchiroli, Maharashtra News

    पुढील बातम्या