Home /News /kolhapur /

Kolhapur: विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ संतप्त, पालकांकडून शाळेवर दगडफेक, कोल्हापुरातील शिरोलीतील घटना

Kolhapur: विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ संतप्त, पालकांकडून शाळेवर दगडफेक, कोल्हापुरातील शिरोलीतील घटना

कोल्हापूर: विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ आक्रमक, संतप्त पालकांची शाळेवर दगडफेक

कोल्हापूर: विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ आक्रमक, संतप्त पालकांची शाळेवर दगडफेक

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात संतप्त झालेल्या पालकांनी आज शाळेवर मोर्चा काढला होता.

    ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 4 एप्रिल : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोलीतील (Shiroli Kolhapur) एका दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या (Class 10 student committed suicide) केली होती. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या विद्यार्थ्याच्या आत्महत्ये प्रकरणात आज ग्रामस्थांनी शाळेवर मूक मोर्चा काढला होता. मात्र, या मूक मोर्चाला हिंसक वळण लागलं आणि संतप्त मोर्चेकरांनी शाळेवर दगडफेक केली. (Stone pelting on Kolhapur School) शिरोली येथील हेरंब बुडकर या विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. तो शिरोलीतील सिमबॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत होता. शाळेतील मुख्याध्यापकांनी काही कारणास्तव हेरंब याला झापलं होतं. इतकेच नाही तर अपमानास्पद भाषाही वापरल्याचा आरोप केला जात आहे. यामुळेच नैराश्य आलेल्या हेरंब याने आत्महत्या केल्याचा पालकांचा आरोप आहे. या प्रकरणात सिमबॉलिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊनही अद्याप कुठलीच कारवाई न झाल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी शाळेवर मोर्चा काढला होता. आत्महत्येला दोन दिवस उलटूनही कारवाई न झाल्याने नागरिकांनी शाळेवर मोर्चा काढला. वाचा : दोन दिवसांत भाजपचे दोन नेते अडचणीत, वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकारण तापलं या मोर्चा दरम्यान संतप्त जमावाने शाळेवर दगडफेक केली. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. तसेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अटक न केल्यास पोलीस स्टेशनवर आंदोलन कऱण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुण्यात वर्गाच्या मॉनिटरला बांबू अन् बेल्टने मारहाण पुणे शहरातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका शालेय विद्यार्थ्यांनं आपल्या काही मित्रांना हाताशी धरून वर्गातील मॉनिटरला बेदम मारहाण केली आहे. अल्पवयीन आरोपीनं मॉनिटरवर वचपा काढला आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत. संबंधित मारहाणीची घटना कोंढवा परिसरातील एका शाळेत घडली आहे. याठिकाणी वर्गाच्या मॉनिटरने काही विद्यार्थ्यांना हेअर कटिंग करून का आले नाहीत? अशी विचारणा केली होती. याच कारणातून विद्यार्थ्यांनी मॉनिटरला बेल्ट आणि लाकडी बांबूने मारहाण केली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Kolhapur, School, Suicide

    पुढील बातम्या