Home /News /maharashtra /

''अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार, आरोप झाला की ते बाहेर काढू'', भाजप मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

''अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार, आरोप झाला की ते बाहेर काढू'', भाजप मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

स्टिंग ऑपरेशन (sting operation) असलेले पेन ड्राईव्ह सादर केले आणि कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या नेत्यांना विनाकारण एखाद्या प्रकारात अडकवण्याचा कट रचला जात आहे त्याचे पुरावे दिले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या आरोपांनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली.

पुढे वाचा ...
जळगाव, 20 मार्च: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत स्टिंग ऑपरेशन (sting operation) असलेले पेन ड्राईव्ह सादर केले आणि कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या नेत्यांना विनाकारण एखाद्या प्रकारात अडकवण्याचा कट रचला जात आहे त्याचे पुरावे दिले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या आरोपांनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये सत्यता आहे, अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. तिकडून एखादा आरोप झाला की आम्ही पुढचे पेनड्राईव्ह बाहेर काढू, असा इशाराही रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. पेन ड्राईव्हमध्ये सत्यता नव्हती तर मग ऍड प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला? असा सवालही रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. पेनड्राईव्ह मध्ये सत्यता आहे. म्हणूनच त्याची चौकशीची मागणी आम्ही केली आहे. त्यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सादर केला. हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना असल्याचे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह केला. 125 तासांचे स्टिंग ऑपरेशन अन् 29 पेन ड्राईव्ह सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केला. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटे कुंभाड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात आहे. शिवाय, पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरते स्पष्ट होते आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलेले आहे. ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितले, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Raosaheb danave, Shivsena

पुढील बातम्या