मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, फडणवीस यांची मागणी

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, फडणवीस यांची मागणी

Deepali Chavan case : या प्रकरणात तत्काळ चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकार्‍यांची तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 2 एप्रिल : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis on Deepli chavan suicide case) यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात तत्काळ चौकशीसाठी वरिष्ठ महिला IPS अधिकार्‍यांची तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरून या पत्राबाबत माहिती देताना त्यांनी सरकारला सुनावले आहे. '' अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?'' अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला धारेवर धरले.

'खटला जलदगती न्यायालयात चालवा'

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकार्‍यांची तत्काळ नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर हा खटला जलदगती न्यायालयात चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अधिकारी त्यांचा कशा प्रकारे छळ करत होते, तसेच त्यांना किती त्रासाला सामोरे जावे लागत होते, हे समोर आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली आणि त्यानंतरल कारवाईची सुत्रे हलली होती.

First published:

Tags: Deepali chavan, Devendra Fadnavis, Uddhav tahckeray