औरंगाबाद, 27 जानेवारी : आताचं सरकार हे मराठवाड्यांचं पाणी पळवून नेईल अशी भीती वाटते. तुम्हाला काय क्रेडिट हवं ते घ्या पण आमच्या मराठवाड्याच्या तोंडचं पाणी हिसकावू नका आणि योजना बंद करू नका अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मराठवाड्याचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असून येथील जनतेच्या सर्वांगिण समृद्धीसाठी पाण्याची उपलब्धता अत्यावश्यक आहे. यासाठी भाजपच्या माजी नेत्या पंकजा मुंडे यांनी आज लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपनेते रावसाहेब दानवे यांनी उपस्थिती दाखवली. यावेळी जनतेशी संवाद साधताना फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाची टीका केली आहे. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण भाजपकडून करण्यात येत आहे. यामध्ये भाजप सरकार असताना आम्ही मराठवाड्यासाठी काही योजना आणल्या पण आताचं सरकार या योजना बंद करण्याच्या तयारीत आहे. पण असं झालं तर आम्ही मोठी लढाई उभारू असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे - मराठवाड्याच्या पाण्याकरता हे उपोषण होत आहे - आम्हाला मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आहे. त्यासाठी आम्ही अनेक योजनांवर काम करत आहोत. - आमच्या योजना पुढे नेल्या नाहीतर मोठी लढाई उभारली जाईल आणि मराठवाड्याला उभं करू - पिण्याचं पाणी, सिंचनाचं पाणी मराठवाड्याकडून हिसकावून घेतलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. - गेल्या 10 वर्षांपैकी 7 वर्ष दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजला आहे. - आपलं सरकार आल्यानंतर आम्ही कृष्णा मराठवाडा योजना आखली. त्यावर योग्य न्याय मिळावा यासाठी आम्ही सगळ्या नेत्यांनी दिल्ली गाठली. पण आताचं सरकार ही योजना बंद करेल की काय अशी भीती आहे. - मुंडे साहेबांच्या नेतृत्तावमध्ये मराठवड्याचं पाणी परत मिळालं पाहिजे - आम्ही मराठवाड्यासाठी अनेक योजना आखल्या आहे. आताच्या सरकारला त्याचं क्रेडिट हवं असेल, तुम्हाला योजनांचं नाव बदलायचं असेल तर बदला पण योजना बंद करू नका. - मराठवाड्याला जलयुक्त शिवारासाठी 29 टीएमसी पाणी हवं आहे. - सरकार मराठवाड्याचं पाणी थांबवेल अशी भीती - मराठवाड्याच्या पाण्याची काम पुढे नेली तर आम्ही तुम्हाला याबाबतीत पाठिंबा देऊ - मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मराठवाड्यालाच मिळालं पाहिजे - कुठल्याही परिस्थितीत मरावाड्याच्या पाण्यासंदर्भात निर्णय या सरकारनं पूर्ण केला पाहिजे - मराठवाड्याला पाण्यासाठी सगळी तयारी आम्ही करून ठेवली आहे. आताच्या सरकारने केवळ मान्यता द्यायची आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.