मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोलेंची भंडाऱ्यात गुप्त भेट, राजकीय चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस आणि नाना पटोलेंची भंडाऱ्यात गुप्त भेट, राजकीय चर्चांना उधाण

या बैठकीनंतर पाच मिनिट फडणवीस आणि नाना पटोले यांच्यामध्ये एकांतात गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

या बैठकीनंतर पाच मिनिट फडणवीस आणि नाना पटोले यांच्यामध्ये एकांतात गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

या बैठकीनंतर पाच मिनिट फडणवीस आणि नाना पटोले यांच्यामध्ये एकांतात गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhandara, India
  • Published by:  sachin Salve

नेहाल भुरे, प्रतिनिधी

भंडारा, 04 ऑक्टोबर : राजकारणात एकमेकांचे विरोधक आणि खाजगी आयुष्यात एकमेकांचे मित्र समजले जाणारे उपमुख्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा रंगली होती. आता खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतली असल्याचे समोर आले आहे.

(मुंबईतील अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर, शिवसेना आणि शिंदे गटामध्ये थेट लढत)

भंडाऱ्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थितीत होते. या बैठकीनंतर पाच मिनिट फडणवीस आणि नाना पटोले यांच्यामध्ये एकांतात गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीबाबत आता उलट सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.

(शिवसेनेची पुन्हा अग्निपरिक्षा? धनुष्यबाण जाणार की राहणार? निवडणूक आयोग घेणार निर्णय?)

नाना पटोले यांचा भंडाऱ्यात साकोली विधानसभा मतदार संघ असल्याने या क्षेत्रासाठी अतिरिक्त निधी मागण्यासाठी नाना पटोले आणि फडणवीस यांची घेतली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. किंवा अजून कोणत्या मोठ्या राजकीय घडामोडीवर चर्चा तर झाली नव्हती याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आलेला आहे. त्यामुळे ही गुप्त भेट अजून काय राजकीय घड़ामोड़ी घडवणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

First published: