मुंबई, 29 नोव्हेंबर : मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांविषयी वादग्रस्त विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. दरम्यान यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत कोश्यारी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. यावेळी ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. मेलो असतो तर बर झालं असतं. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या वाक्याचा संदर्भ घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांच्या राजीनाम्याविषयी सूचक वक्तव्य केले आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले की, खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत, असल्याचे फडणवीस म्हणाले. ते पुण्यात काल पत्रकारांशी बोलत होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कोर्टातून आली मोठी माहिती समोर
छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
उदयनराजे झाले भावूक
राज्यपालांविरोधात उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'राजकीय स्वार्थासाठी शिवरायांचा वापर केला जात आहे. असा आरोप उदयनराजे यांनी यावेळी केला. महाराजांबद्दल गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते तेव्हा राग कसा काय येत नाही. आता जनतेनं विचार करणं गरजेचं आहे. विकृतीकरण थांबवलं नाही तर नव्या पिढीसमोर कोणता इतिहास मांडणार. असा सवाल उपस्थित केला.
शिवरायांचा अपमान होताना सर्वपक्ष गप्प का? थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा का नाही. हे पाहण्यापेक्षा मेलो असतो तर परवडलं असतं? शिवरायांचा अपमान होतो तेव्हा दुःख होते अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराजांच नाव घेण्याचा कुणालाल अधिकार नाही. राज्यापालांवर कारवाई का केली नाही.
हे ही वाचा : 'बुलडाण्यातून निवडणूक लढवून दाखवा', शिंदे गटाच्या खासदाराचे थेट उद्धव ठाकरेंना चॅलेंज
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची याप्रकरणी भेट घेणार आहे. तसेच, ३ डिसेंबरला राडगडावर धरणं आंदोलन करणार असल्याची माहिती उदयनराजे यांनी यावेळी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Devendra Fadnavis, Governor bhagat singh, Maharashtra News, Maharashtra political news