राहुल खंदारे प्रतिनिधी
बुलडाणा, 29 नोव्हेंबर : 'हिंमत असेल तर बुलढाणा येथून लोकसभा निवडणूक लढवा' असे खुले चॅलेंजच बाळासाहेबांच्या शिवसेना गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांनी चिखली येथील शेतकरी सभेमध्ये शिंदे गटातील खासदार आणि आमदारांना सांगितले होते की, तुम्ही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार नाही, असेल हिम्मत तर जाहीर करा' त्यांच्या या विधानावर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरेंचा खुला चॅलेज दिला आहे.
(महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी नाही, कोर्टातून आली मोठी माहिती समोर)
'उद्धव ठाकरे यांनी माझ्या विरोधात बुलढाणा इथं लोकसभा लढवावी, मी शिवसेनेवरच निवडणूक लढणार' असं खासदार जाधव यांनी बोलून चक्क उद्धव ठाकरे यांना आव्हान केलं आहे.
तसंच, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत महिलांचा एक गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर देखील शिंदे गटात सामील झालेले खासदार प्रतापराव जाधव यांनी सडकून टीका केली आहे. ज्या ठिकाणी मुर्खांचा बाजार भरतो, त्या ठिकाणी गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. आता तिथे सर्व उपरे लोक भरले आहेत, असं खासदार जाधव म्हणालेत.
(उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कृष्णा हेगडे शिंदे गटात, लगेच मोठी जबाबदारीही दिली)
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच गजानन कीर्तिकर यांच्यानंतर 3 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहे. आम्ही लोकांमध्ये राहणारे आहोत. आणखी काही लोक आमच्या संपर्कामध्ये आहे. पण काही स्थानिक अडचणी आहे, जिल्ह्यातील काही काम आहे. नेतृत्वावर प्रेम आहे म्हणून ते तिकडे थांबलेले आहे. जशा निवडणुकासमोर येतील शिवसेनेचे घर खाली झालेले असेल, असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news