मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

ब्रिटीशांची COVAXIN ला मान्यता, कोट्यवधी भारतीयांना दिलासा

ब्रिटीशांची COVAXIN ला मान्यता, कोट्यवधी भारतीयांना दिलासा

ब्रिटनने आता COVAXIN लसीला (Britain approves Covaxin no need to get quarantined from 22 November) आपातकालीन वापराच्या यादीत समाविष्ट केल्यामुळ कोट्यवधी भारतीयांचा क्वारंटाईन होण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे.

  • Published by:  desk news

लंडन, 13 नोव्हेंबर: ब्रिटनने आता COVAXIN लसीला (Britain approves Covaxin no need to get quarantined from 22 November) आपातकालीन वापराच्या यादीत समाविष्ट केल्यामुळ कोट्यवधी भारतीयांचा क्वारंटाईन होण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे. 22 नोव्हेंबरपासून या निर्णयाच्या (Implementation from 22 November) अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या मान्यतेनंतर आता ब्रिटन सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णय़ामुळे कोट्यवधी भारतीय नागरिकांना दिलासा (Relief for many Indians) मिळणार आहे.

भारतीयांना दिलासा

कोव्हिशिल्डपाठोपाठ भारतात सर्वाधिक घेतली जाणारी लस अशी कोव्हॅक्सिनची ख्याती आहे. मात्र आतापर्यंत या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे ब्रिटनदेखील या लसीला मान्यता दिली नव्हती. त्यामुळे ही लस घेतलेल्या कोट्यवधी भारतीयांना ब्रिटनमध्ये लसीकरण न झालेल्या नागरिकांच्या यादीत गणलं जात होतं. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर ब्रिटननेदेखील या लसीचा समावेश मान्यता असलेल्या लसींच्या यादीत केला आहे.

बहुतांश भारतीयांना दिलासा

यापूर्वी कोव्हिशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांनाच केवळ ब्रिटनमध्ये क्वारंटाईन न होता प्रवेश मिळत होता. मात्र कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना ही सवलत मिळत नव्हती. जागतिक आरोग्य संघटनेनं मान्यता दिलेल्या लसींनाच आपल्या देशात मान्यता देण्याचं धोरण सध्या जगातील बहुतांश देशांनी स्विकारलं आहे. ब्रिटननंदेखील हेच धोरण स्विकारलं आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेमुळे ब्रिटनसह अनेक देशांत भारतीयांना प्रवास करण्यात येणारे अडथळे दूर होणार आहेत.

भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त एलेक्स ऍलिस यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. ज्या भारतीयांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना आता ब्रिटनमध्ये क्वारंटाईन होण्याची गरज पडणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा- पत्नीने घरात लावला सीक्रेट कॅमेरा; महिलेच्या मैत्रिणीसोबत पतीला रंगेहात पकडलं

जागतिक आरोग्य संघटनेनं 3 नोव्हेंबर रोजी कोव्हॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांना जगाचे दरवाजे उघडले आहेत.

First published:

Tags: Britain, Corona, Vaccination