Home /News /maharashtra /

''अल्टिमेटमची भाषा कोणी करु नये, कायदा हातात घेण्याचे धाडस केल्यास...'', अजित पवारांचा इशारा

''अल्टिमेटमची भाषा कोणी करु नये, कायदा हातात घेण्याचे धाडस केल्यास...'', अजित पवारांचा इशारा

अल्टिमेटमची भाषा कोणी करु नये, असा इशारा आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिला आहे.

    पुणे, 05 मे: अल्टिमेटमची भाषा कोणी करु नये, असा इशारा आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिला आहे. राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरेंनी राज्य सरकारला (state government) 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर राज्यात काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी बऱ्याच ठिकाणी हनुमान चालीसाचं पठण केलं. पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड ही केली. पण काल राज्यभरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. राज्य कायद्याने चालते. नियम सर्वांना बंधनकारक आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेण्याचे कुणी धाडस केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे. राज्यातील सामाजिक सलोखा न बिघडवण्याचं आवाहन विरोधकांना यावेळी अजित पवार यांनी केलं आहे. राज्यात काल घडलेल्या परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. कुणी धरले हात, कुणी धरले पाय आणि...; हळदीत मित्रांनी नवरीबाईसोबत केली नको ती मस्ती; VIDEO VIRAL कुणीही उग्र आंदोलन करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई होईलच, असा इशाराच उपमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिला आहे. राज्यातील पोलीस यासाठी सक्षम असल्याही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या 26 मशिदींच्या मौलवींचा मोठा निर्णय ज ठाकरेंनी दिलेला अल्टिमेटम काल संपल्यानंतर राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदीबाहेर हनुमान चालीसाचं पठण केलं. काल दिवसभरात पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांची (MNS activists) धरपकड सुरुच होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या मौलवींनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या 26 मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्याविना करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येतेय. दक्षिण मुंबईतील जवळपास 26 मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्याविना करण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केलं आहे. दक्षिण मुंबईतील जवळपास 26 मशिदींच्या मौलवी आणि धर्मगुरूंची बुधवारी रात्री उशिरा बैठक झाली. मौलवी आणि धर्मगुरू यांच्यात झालेल्या बैठकीत या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत यापुढे पहाटेची अजान लाउडस्पीकर शिवाय केली जाईल असा ठराव संमत करण्यात आला. सुन्नी बडी मशिदीमध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला भायखळाच्या मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा येथील मुस्लीम धर्मगुरू सहभागी झाले होते. या बैठकीत ठरवण्यात आलं की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर न करता मशिदींमध्ये अजान केली जाईल. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन करत मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीत पहाटेची अजान आज लाऊडस्पीकर विना करण्यात आली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Ajit pawar, MNS, Raj Thackeray (Politician)

    पुढील बातम्या