मुंबई, 05 मे : लग्न म्हटलं की धमाल, मजा मस्ती आलीच. लग्नाआधी बरेच कार्यक्रम होतात. हळद, मेंदी, संगीत अशा कार्यक्रमांची धूम असते. यात नवरा-नवरीला त्रास देण्याची किंवा छेडण्याची एक संधी सोडली जात नाही
(Wedding Haldi funny video). विशेषतः मित्रमैत्रिणी तर ही संधी कधी मिळते यावर टपूनच असतात. पण मजेमजेत ते बऱ्याचदा असं काही करतात ज्याचा नवरानवरीने विचारही केला नसतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे
(Wedding Haldi video).
हळदीत नवरीबाईच्या मित्रांनी तिच्यासोबत नको ती मस्ती केली. ज्यामुळे हळदीच्या दिवशीच नवरीबाईच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हळदीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुरुवातीला धक्का बसेल पण नंतर हसूही आवरणार नाही.
व्हिडीओत पाहू शकता हळदीचा कार्यक्रम आहे. नवरीबाई नटूनथटून हळदीसाठी तयार झाली आहे. हळदीला तिचे मित्रमैत्रिणीही आले. हळदीत तिच्या मित्रांनी तिची थोडी मजा घ्यायचं ठरवलं. त्यासाठी काही मित्रांनी तिला उचलून घेतलं आहे. काहींनी हात धरले. काहींनी पाय धरले आहेत आणि एका स्विमिंग पूलसमोर ते उभे राहिले आहेत.
हे वाचा - बाबो! लग्नात 24 कॅरेट Gold Dress घालून आली नवरीबाई; पाहताच पाहुण्यांनी...
नवरीबाई घाबरलेली दिसते आहे. ती मध्येच भीतीने ओरडतेही. पण मित्रांना काहीच वाटत नाही. ते नवरीबाईला हवेत झुलवतात आणि अचानक स्विमिंग पूलमध्ये पाण्यात फेकून देतात. पाण्यात नवरीबाईला सावरायला तिची बहीण आधीपासूनच आहे. जशी नवरीबाई पाण्यात कोसळते तशी ती तिला सांभाळून घेते.
द बोहो गर्ल नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे.
हे वाचा - VIDEO - रब ने बना दी जोडी! 36 इंचाच्या नवरदेवाला भेटली 34 इंचाची नवरी; कपलची एक झलक पाहण्यासाठी गर्दी
हळदीतील अशी मस्ती तुम्हाला कुणासोबत करायला आवडेल त्या व्यक्तीसोबत ही बातमी शेअर करा. तसंच आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.