सातारा, 27 जुलै : थंडगार हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरातील पाँईंटला देण्यात आलेली इंग्रजांची नावे ही तातडीने बदलावी आणि या सर्व पाँईंटला क्रांतीकारकांची नावे द्यावीत, अशी मागणी सध्या भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीमार्फत करण्यात आली आहे. याबाबत अधिकाऱ्यांना पत्रे देण्यात आली आहेत. या विषयावरून आता येथील थंड हवामान तापण्याची शक्यता आहे. महाबळेश्वरातील पाँईंटची नावे - ऑर्थरसिट, विल्सन पाँईंट, लॉडविक पाँईंट, लेस्ली विल्सन पाँईंट, केटस् पाँईंट, एलिफन्ट हेड, निडल होल पाँईंट, बेबींन्टन पाँईंट, इको पाँईंट, बाँम्बे पाँईंट, लिंग मळा वॉटर फाँल पाँईंट, किंग चेअर पाँईंट, विंडो पाँईंट, इको पाँईंट हन्टिंग पाईंट, टायगर स्प्रिंग पाँईंट, कॅसल रॉक पाँईंट, मंकी पाईंट पाँईंट, मरजोरी पाँईंट, कॅटस पाईंट पाँईंट, मिडल पाँईंट, सनसेट पाँईंट, प्लॅटो पाँईंट, वेण्णालेक पाँईंट, पारसी पाँईंट, महाबळेश्वरचा थोडक्यात इतिहास - 1819 मध्ये मराठा साम्राज्याचे पतन झाल्यानंतर ब्रिटीशांनी महाबळेश्वरच्या आसपासच्या डोंगरांना साताऱ्याच्या जिल्ह्याला जोडले. 1828 मध्ये ब्रिटीशांनी महाबळेश्वरच्या बदल्यात सातारच्या महाराजांना काही शहरे दिली. जुन्या नोंदीमध्ये महाबळेश्वरला गर्वरनरच्या नावाने माल्कम पेठ म्हटले गेले. ब्रिटीश शासकांना हील स्टेशन्समध्ये इंग्लंड सारखे वातावरण हवे होते, हे लक्षात घेऊन युरोपीयन वनस्पती स्टाँबेरी महाबळेश्वरमध्ये लावल्या. आणि लायब्ररी, थेटर, बोटिंग, तलाव, क्रिडांगणे या सारख्या सुविधा विकसित केल्या गेल्या. 19 व्या शतकाच्या समाप्तीपूर्वी हे जगातील प्रचलित हिल स्टेशन म्हणून ओळखले जाऊ लागले. महाबळेश्वरचे वैशिष्ठ - महाबळेश्वर हे समुद्र सपाटी पासून सुमारे 4500 फुटापेक्षा जास्त उंचीवर असलेले थंडगार हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वरमध्ये प्रत्येक वर्षी 15 लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देत असतात. महाबळेश्वरात 12 महिने पर्यटकांची रेलचेल सुरु असते. महाबळेश्वरवासियांचा संपूर्ण व्यवसाय हा पर्यटकांवर आवलंबून आहे. महाबळेश्वरातील दऱ्याखोऱ्यांमधील निसर्ग हा पर्यटकांना आकर्षित करत असतो. महाबळेश्वरात बाराही महिने थंडी जाणवते. उन्हाळ्यात दुपारचा थोडफार कालावधी गेला तर उन्हाळ्यातही महाबळेश्वरात थंडी जाणवते. महाबळेश्वरात हिवाळ्यात अनेक भागात दवबिंदू गोठण्याइतका पारा खालावतो. विविधतेने नटलेला निसर्ग हे महाबळेश्वरचे खास वैशिष्ठ मानले जाते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर महाबळेश्वरातील क्षेत्र महाबळेश्वर याच एक वेगळेच वैशिष्ठ मानले जाते. या ठिकाणी पाच नद्यांचा उगम होतो आणि नंतर या नद्यांचे महाकाय रुप पुढे गेल्यावर पहायला मिळते. या ठिकाणची पिकवली जाणारी स्ट्रॉबेरी ही जगप्रसिध्द आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्षाने पावन झालेले महाबळेश्वर आहे. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा महाबळेश्वरातील ही नावे ब्रिटीश कालीन असली तरी महाबळेश्वरकर वासियांना मात्र या नावाच्या बदलाबाबत आक्षेप असू शकणार आहे. त्यामुळे या नावात बदल करायचा झाल तर अंगवळनी पडलेली नावे बदलताना स्थानिकांच्या संघर्षाला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.