जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्री शिंदेना जीवे मारण्याची धमकी, दारुच्या नशेत फोन; एकाला अटक

मुख्यमंत्री शिंदेना जीवे मारण्याची धमकी, दारुच्या नशेत फोन; एकाला अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोमवारी रात्री ११२ या क्रमांकावर फोन करून मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 11 एप्रिल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील वारजे इथून ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर मध्यरात्री फोन करण्यात आला होता. फोनवरून व्यक्तीने धमकी देत लगेच कॉल कट केला. कॉल करणारा शास्त्री नगर, धारावी इथे राहणारा असल्याची माहितीही समोर आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री ११२ या क्रमांकावर फोन करून मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यावेळी धमकी देणाऱ्याने मी एकनाथ शिंदे यांनी उडवणार आहे असं म्हटलं आणि कॉल कट केला. पुण्यातील वारजे परिसरातून हा कॉल करण्यात आला होता. महाराष्ट्रात पुन्हा गायीचं मृत्यूकांड, चाऱ्याअभावी 12 गायींनी सोडला जीव   याप्रकरणी पोलिसांनी राजेश आगवणे याला अटक केलीय. त्याने दारूच्या नशेत आधी ॲम्बुलन्सला फोन केला. त्यानंतर ११२ वर फोन केला. पुणे पोलिसांनी त्याला अटक केलीय. तो धारावी, मुंबईत वॉर्ड बॉय म्हणून काम करतो. पत्नी कोथरुडला खाजगी ठिकाणी काम करते. तिला भेटायला महिन्यातून दोन वेळा येतो. तो दारूच्या नशेत कोणालाही शिवीगाळ करतो असे त्याची पत्नी व ओळखीचे लोक सांगत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

काल रात्री प्रथम त्याने ११२ वर कॉल करून छातीत दुखतंय एम्ब्युलन्स पाठवा असे कळविले होते. त्यासाठी नियंत्रण कक्षातून १०८ ला कळवा असे सांगितल्यावर त्याने दुसऱ्यांदा त्याच नंबर वरून माननीय मुख्यमंत्री शिंदेंना धमकी देण्याचा कॉल केला. यानंतर त्याची माहिती घेऊन जेव्हा ताब्यात घेतलं गेलं तेव्हा तो दारुच्या नशेत असल्याचं आढळून आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात