जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / महाराष्ट्रात पुन्हा गायीचं मृत्यूकांड, चाऱ्याअभावी 12 गायींनी सोडला जीव

महाराष्ट्रात पुन्हा गायीचं मृत्यूकांड, चाऱ्याअभावी 12 गायींनी सोडला जीव

महाराष्ट्रात पुन्हा गायीचं मृत्यूकांड, चाऱ्याअभावी 12 गायींनी सोडला जीव

गायींचे संरक्षण करणारे सरकार पण चाऱ्याअभावी 12 गायींनी सोडला जीव, रत्नागिरीतील भयानक घटना

  • -MIN READ Local18 Ratnagiri,Maharashtra
  • Last Updated :

रत्नागिरी(चंद्रकांत बनकर), 11 एप्रिल : रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथील गो शाळेत सध्या एक हजाराहून अधिक गाई आहेत. मात्र शासनाकडून उर्वरित निधी उपलब्ध न झाल्याने तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोटे येथील संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थेच्या या गो शाळेत चाऱ्या अभावी १०० हुन अधिक गाईंची प्रकृती ढासळली आहे. तर गेल्या महिना भरात 12 हुन अधिक गाईंचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आहे. या गो शाळेचे संचालक व जेष्ठ कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांनी आजपासून गो शाळेमध्येच आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.

जाहिरात

सण 2008 साली कसायाकडे जाणाऱ्या गाईंना वाचवण्यासाठी तसेच महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गाईंना आसरा देण्यासाठी एका आश्रमाची स्थापना करण्यात आली. गाईंची सेवा करण्यासाठी जेष्ठ कीर्तनकार भगवान कोकरे महाराज यांनी संत ज्ञानेश्वर माउली जीवन मुक्ती धाम सेवा संस्था स्थापन केली. त्याठिकाणी जिल्ह्यातली पहिली मोठी गो शाळा स्थापन केली.

अकोला दुर्घटना प्रकरण : मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

2017 मध्ये या गोशाळेसाठी महाराष्ट्र शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्राकडून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी 75 लाख रुपये दिले गेले त्यातून या संस्थेने गो शाळेसाठी आवश्यक बांधकामे केली. मात्र गेल्या चारवर्षांपासून मंजूर निधी पैकी उर्वरित असेलेले 25 लाख शासनाकडून प्राप्त न झाल्यामुळे या गो शाळेतील हजारो गाईंवर उपासमारीची वेळ आली आहे.

जाहिरात

सध्या या गो शाळेत 1 हजाराहून अधिक गाई असून त्यातील शंभर पेक्षा अधिक गायी योग्य व पोटभर चारा न मिळाल्याने आजारी व अशक्त झाल्या आहेत. गेल्या महिना भरात 12 गाईंचा उपासमारीमुळे मृत्यू देखील झाला असल्याचे भगवान कोकरे महाराज यांनी सांगितले, कीर्तनाच्या मिळालेल्या पैशातून गाईंसाठी व त्यांना जगवण्यासाठी भगवान कोकरे महाराज यांची धडपड सुरु आहे.  

जाहिरात
तुम्हाला घरी कुत्रा पाळायचा आहे? मनस्ताप टाळण्यासाठी ‘ही’ घ्या खबरदारी, Video

मात्र गाईंची संख्या हजारो असल्याने त्यांना देखील सर गाईंना पोसणे आता शक्य होत नाही . या संधर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देखील दिले असून शासनाकडून उर्वरित अनिधि मिळावा व गो शाळेसमंधी इतर अडचणी सोडवाव्यात या मागणी साठी या गो शाळेतच भगवान कोकरे महाराज यांनी आजपासून उपोषण सुरु केले आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात