जाहिरात
मराठी बातम्या / देश / प्रसवकळांसह महिला 100 किमी अंतरावर भटकत होती, प्रसूतिनंतर आली धक्कादायक माहिती समोर

प्रसवकळांसह महिला 100 किमी अंतरावर भटकत होती, प्रसूतिनंतर आली धक्कादायक माहिती समोर

प्रसवकळांसह महिला 100 किमी अंतरावर भटकत होती, प्रसूतिनंतर आली धक्कादायक माहिती समोर

प्रसूतिझाल्यानंतर कुटुंबीय आनंदी झाले होते. इतका वेळ सुरू असलेला त्रास महिला आणि तिचा पती विसरुन गेले होते. मात्र…

  • -MIN READ
  • Last Updated :

श्रीनगर, 3 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र याशिवाय अनेकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेषत: गर्भवती महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. काश्मिरमधील एक महिलेला प्रसवकळांसह 100 किमीपर्यंत भटकावे लागले. कोणत्याही रुग्णालयात महिलेला भरती करून घेत नसल्याने ती आपल्या पत्नीसह बराच वेळ भटकत राहिली. अखेर एका रुग्णालयात तिची प्रसूती झाली. त्यामुळे आनंदाचं वातावरण होतं. मात्र काही वेळात ही वातावरण बदललं. जेव्हा महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर तिच्या पतीच्या पायाखालची जमीन सरकली. ही महिला अनंतनाग जिल्ह्यातील तेलवानी येथे राहणारी आहेत. हा परिसर लेड झोनमध्ये येतो. जेव्हा तिला प्रसवकळा सुरू झाल्या तेव्हा ती आपल्या आई-वडिलांकडे शेरगुंदामध्ये होती. तिचा पती शुक्रवारी साधारण रात्री 8 वाजता तिला शानगुस  सरकारी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र येथील ड़ॉक्टरांनी तिला 8 किमी लांब शानगूस सरकारी रुग्णालयात जाण्यास सांगितले. आम्ही रुग्णवाहिकेने अचाबलच्या रुग्णालयात पोहोचलो. येथील एक डॉक्टरने अनंतनाग मॅटरनिटी एंज चाइल्ड केअर रुग्णालयात जाण्यास सांगितले. महिला रेड झोन भागातील असल्याने तिला कोणी दाखल करुन घेत नव्हतं. त्यामुळे तब्बल 100 किमी अंतरावर त्यांना धावपळ करावी लागली. शेवटी दुसऱ्या दिवशी 2 वाजता त्यांना एका रुग्णालयात दाखल केले. येथे महिलेची प्रसुती झाली खरी मात्र महिलेचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला. एका क्षणात वातावरण बदललं. संबंधित - घरात सतत होती मद्यपींची गर्दी, मात्र गरीबीवर मात करीत मुलाने रचला नवा इतिहास

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात