जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dasara Melava : ठाकरे का शिंदे, दसरा मेळाव्याचा कुणाचा टिझर भारी? दोन्ही Video पाहा अन् तुम्हीच ठरवा!

Dasara Melava : ठाकरे का शिंदे, दसरा मेळाव्याचा कुणाचा टिझर भारी? दोन्ही Video पाहा अन् तुम्हीच ठरवा!

Dasara Melava : ठाकरे का शिंदे, दसरा मेळाव्याचा कुणाचा टिझर भारी? दोन्ही Video पाहा अन् तुम्हीच ठरवा!

दसरा मेळाव्याआधी शिंदे आणि ठाकरे गटांमधलं वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. दोन्ही गटांकडून या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 30 सप्टेंबर : दसरा मेळाव्याआधी शिंदे आणि ठाकरे गटांमधलं वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. दोन्ही गटांकडून या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात होणार आहे. या दोन्ही मैदानांमध्ये फक्त 6-7 किमीचं अंतर आहे, त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी मुंबईचं राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर लॉन्च करण्यात आला आहे. ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान…शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!’ असं कॅप्शन देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांचा टिझर लॉन्च केला आहे. निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, असं या टीझरमध्ये म्हणण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे ज्या स्टाईलने भाषणाची सुरुवात करतात तेही दाखवण्यात आलं आहे.

जाहिरात

दुसरीकडे कालच शिंदे गटाकडूनही त्यांच्या दसरा मेळाव्याचा टिझर लॉन्च करण्यात आला. या टिझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा पुतळा तर एकनाथ शिंदे यांचा फोटोही टिझरमध्ये वापरण्यात आला आहे.

5 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता वांद्र्याच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरूवात होणार आहे. दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा आहे. त्यासाठी साधारणत: अडीच ते तीन लाख लोक येण्याची शक्यता आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात