अविनाश कानडजे,(औरंगाबाद) 19 नोव्हेंबर : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात. राज्य असो किंवा देश पातळीवरील कोणताही राजकीय मुद्दा असो जलील यांच्या वक्तव्यामुळे नेहमी खळबळ होत असते. दरम्यान ते आता वेगळ्याच कारणावरून चर्चेत आले आहेत. खासदार जलील यांच्यावर कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी चक्क नोटा उधळल्या आहेत. जलील यांच्यावर नोटा उधळत डान्स करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने याची जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान जलील यांच्यावर यापूर्वीही असाच नोटांचा पाऊस पाडण्यात आला होता. औरंगाबाद आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पडत होता. तर जलील यांच्यावर पैसे उधळण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळल्या, व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/aNW2jMmM3E
— News18Lokmat (@News18lokmat) November 19, 2022
हे ही वाचा : नीलम गोऱ्हे लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण
विशेष म्हणजे जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसमारंभात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही जलील यांच्यावर नोटा उधळल्या होत्या. आता तोच प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.
खासदार जलील यांच्याकडून आमखास मैदानावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जात आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येक जण येऊन भेट देऊन जात आहेत. दरम्यान जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर एकदाही शेतकऱ्यांच्या बांधावर न जाणारे जलील यांच्यावर अशा प्रकारे पैसे उधळताना बघून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा : 'मी माझं पद दाखवलं तर बरीच लफडी बाहेर येतील'; गुलाबराव पाटलांच्या निशाण्यावर कोण?
जलील यांच्यावर पैसे उधळण्याची दुसरी वेळ
एमआयएमचे तत्कालीन औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर साजेद यांच्या भाचीचे लग्न शहरातील एका प्रसिद्ध लॉनमध्ये झाले होतं. यावेळी कव्वालीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. दरम्यान यावेळी आलेले जलील नरवदेवाला भेटण्यासाठी व्यासपीठावर जाताच त्यांच्यावर नोटांचा वर्षाव करण्यात आला होता. तर खुलताबाद येथे आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमात देखील जलील यांच्यावर अशाच प्रकारे पैसे उधळले गेले होते. ही घटना डिसेंबर 2021 मध्ये घडली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Aurangabad News, MIM, ओवेसी MIM