मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ओव्हरटेकच्या नादात क्रुझर आणि कारची समोरासमोर धडक, 4 जण ठार

ओव्हरटेकच्या नादात क्रुझर आणि कारची समोरासमोर धडक, 4 जण ठार

बस स्थानकापासून अगदी काही अंतरावरच ओव्हरटेक करत असताना या दोन्ही गाड्या समोरासमोर धडकल्या

बस स्थानकापासून अगदी काही अंतरावरच ओव्हरटेक करत असताना या दोन्ही गाड्या समोरासमोर धडकल्या

बस स्थानकापासून अगदी काही अंतरावरच ओव्हरटेक करत असताना या दोन्ही गाड्या समोरासमोर धडकल्या/

परभणी, 26 डिसेंबर : परभणी (parabhani) जिल्ह्यातील गंगाखेड लोहा मार्गावर कारचा (car accident) भीषण अपघात झाला आहे. भरधाव क्रुझर जीप (Cruiser) आणि कारचा समोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात 4 जण ठार झाले आहे. तर 3 ते 4 जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड - लोहा या राष्ट्रीय महामार्गावर आज संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नांदेडहुन गंगाखेडकडे येत असलेली भरधाव क्रुझर जीप, तर गंगाखेडहुन लोह्याकडे जात असलेल्या हुंदई कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात पालम तालुक्यातील पेठशिवणी जवळ झाला.

(हेही वाचा - या' लोकांना देणार कोरोना लशीचा बुस्टर डोस; पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय)

पेठशिवणीच्या बस स्थानकापासून अगदी काही अंतरावरच ओव्हरटेक करत असताना या दोन्ही गाड्या समोरासमोर धडकल्या. ही धडक इतकी भीषण होती की, यात हुंदई कारचा चुराडा झाला आहे. समोरील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे त्यामुळे कारमधील समोर बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर अक्षरश: कटरच्या मदतीने कारचा भाग कापावा लागला, त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले.

(हेही वाचा - आता लहान मुलांनाही मिळणार कोरोना लस; 'भारत बायोटेक'ला मिळाला हिरवा कंदील)

या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असून, त्यात त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमी रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

First published:

Tags: Parbhani, परभणी