सोलापूर, 11 जून : सोलापूर जिल्ह्यातील (Solapur zoo) विजापूर रस्त्यावर महापालिकेचे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय (mahatma gandhi zoo in Solapur) आहे. या प्राणी संग्रहालयात आहेत. या प्राणी संग्रहालयात 77 अतिरिक्त वन्यप्राण्यांचा आदिवास आहे. यामुळे या प्राण्यांची मुक्तता करण्यात येणार आहे. अतिरिक्त वन्यप्राणी वनखात्याच्या परवानगीनंतर सह्याद्री पर्वतरांगेत सोडण्यात येणार आहे. याबबात महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी माहिती दिली. यामध्ये मगर, चितळ, काळवीट, सांबर (Crocodile, Chital, Antelope, Sambar) अशा प्राण्यांचा समावेश आहे यांना मुक्तता मिळणार आहे.
यावेळी आयुक्त शिवशंकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील विजापूर रस्त्यावर महापालिकेचे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय आहे. तेथे प्रजनाने पिंजऱ्यांच्या क्षमतेपेक्षा प्राण्यांची संख्या अधिक झाली आहे. त्यामुळे महापालिकेपुढे अतिरिक्त प्राण्यांचे काय करावयाचे, असा प्रश्न होता. याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. या अनुषंगाने राज्य शासनाच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पशुपक्षी-प्राण्यांच्या गणनेसाठी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली होती. त्यावेळी अतिरिक्त वन्य प्राणी आणि त्यांची गैरसोय होत असल्याचा विषय ऐरणीवर आला. याबाबत अनेक पर्याय सुचविण्यात आले.
Nashik Rain : नाशिकमध्ये सलग दोन दिवस पावसाने दैना, एका शेतकऱ्यासह दोन बैलांचा वीज पडून मृत्यू
अखेर वन खात्याने हे प्राणी सह्याद्री पर्वतरांगांच्या पट्ट्यात सोडण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात राज्याचे प्रधान वनसंरक्षक सुनील लिमये यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकही घेतली होती. या बैठकीनंतर आता वन खात्याच्या मान्यतेची औपचारिकता बाकी आहे. लवकरच मान्यता मिळताच वन विभागाकडून अतिरिक्त 77 प्राणी सह्याद्री पट्ट्यात सोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
कोणत्या प्राण्यांची मुक्तता?
मनपाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वनाथ गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयात सध्या 137 पशु-प्राणी आहेत. यामध्ये 3 मोर, 69 चितळ, 19 काळवीट, 12 सांबर हरण, 8 बोनेट माक, 6 रेसेस माकड, 4 बिबट्या, 16 मगरींचा समावेश आहे. एकंदर 77 प्राणी सह्याद्री पर्वतरांगेत सोडल्यानंतर अतिरिक्त प्राण्यांच्या प्रश्न लवकरच सुटण्याच्या मार्गावर आहे. शासनाकडून मान्यता मिळताच याची अंमलबजावणी होणार आहे.
"जो चमत्कार झाला तो मान्य केला पाहिजे, फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली" - शरद पवार
प्राणीसंग्रहालयातील 77 अतिरिक्त प्राण्यांमध्ये 9 मगर, 51 चितळ, 15 काळवीट, 2 सांबरांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर या सर्व प्राण्यांना प्राणीसंग्रहालयातून मुक्त करून सह्याद्री पट्ट्यातील नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Solapur (City/Town/Village), Solapur news, Wild animal, Zoo