नाशिक, 11 जून : राज्यात कालपासून अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. (Maharashtra monsoon rain) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, विदर्भ याभागात पावसाचा जोर वाढला आहे. (Yellow alert) मान्सून पूर्व पावसाने (pre monsoon rain) हजेरी लावल्याने खरिपाची पेरणी (kharif sowing) शेतकरी (farmer) सुखावला असला तरी केळी व अन्य पिकांना दणका बसल्याने काही शेतकऱ्यांना याचा जोरदार फटका बसला आहे. दरम्यान कालपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार (Nashik district heavy rain fall) पाऊस पडत आहे. विजाच्या कडकडाटाने पाऊस पडत असल्याने एका शेतकऱ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत नाशिकमध्ये तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहर व परिसरात सलग दोन दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. काल (दि.10) सायंकाळनंतर आलेल्या या पावसाने नाशिककरांची धांदल उडवली. नाशिकच्या ग्रामीण भागात कळवणमध्ये मौजे विसापूर येथे वीज पडून 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच सटाण्यातील केरसानेत वीज पडून बैलजोडी ठार झाली.
हे ही वाचा : Weather Forecast : राज्यातील ‘या’ भागात पावसाचा yellow alert, दोन दिवसांत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रीय
मागच्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. काल पाचच्या सुमारास अवघ्या काही मिनिटांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने रस्ते जलमय झाले. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नाशिककरांची पंचाईत झाली. दरम्यान, या पावसाने शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत तो सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे पूर्ण केल्याचा महावितरणचा दावा साफ खोटा ठरला.
ग्रामीण भागात कळवण व सटाण्यात मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतकरीराजाची धावपळ उडाली. मौजे विसापूर (सटाणा) येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास वीज अंगावर पडल्याने बारकू गोपू सोनवणे ( 36 ) या इसमाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत वीज पडून तिघा इसमांचा मृत्यू झाला. दरम्यान, अन्य तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. पावसापासून शेतमाल वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती.
हे ही वाचा : Rajya Sabha Election: धनंजय महाडिकांनी अखेर मैदान मारलं; वडिलांच्या विजयानंतर मुलगा भावूक
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्याने शेकडो झाडे उन्मळून पडली. तर 93 घरांची पडझड झाली असून 17 कांदाचाळी, 2 पोल्ट्री, 3 शेडनेटचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात 44 घरांचे नुकसान झाले. चांदवडमध्ये 27, नांदगाव 16 तर सिन्नर येथे 5 व नाशिक तालुक्यात एका घराचे नुकसान झाले. मनमाड परिसरात पावसाने 4 ते 5 कांदाशेड जमीनदोस्त झाले असून, इंडियन हायस्कूलच्या खोल्यांचे पत्रे उडाले. नांदगावला 2 पोल्ट्री शेडचे नुकसान झाले. पावसाने 7 जनावरेही दगावली. चांदवड तालुक्यातील 1 दुकान व 1 लॉन्स, तर नांदगावला 1 टपरी व शाळेचे पत्रे उडाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Nashik, Rain, Rain updates, Weather update, Weather warnings