मुंबई, 29 जून : मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra monsoon update) सगळीकडे पोहोचला असे हवामान खात्याकडून (imd alert) सांगितले जात असले तरी काही जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे. दरम्यान विदर्भातील (vidarbha rain) अनेक जिल्ह्यात मागच्या महिन्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. (farmer) परंतु त्यांनतर पाऊस न झाल्याने पेरणी केलेल्या बियांणा (see sowing) बुरशी येऊन बियाणे जमीनीतच कुजली जात आहेत. तसेच उगवून आलेले पिकही पावसाअभावी करपून जात असल्याचे चित्र दिसत आहे. एकिकडे शिवसेनेत बंडखोरी (shiv sena rebel) करून गेलेल्या आमदारांच्या मतदार संघात शेतकरी संकटात (farmer) आहे. बंडखोर आमदार काय झाडी, काय हाटेल, काय डोंगार करत बसले आहेत. परंतु शेतकरी संकटात सापडला आहे त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाहीत.
पावसाचा खंड पडल्याने जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवरील पेरणी बाद झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र कापसाचे आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. याबाबत दैनिक अॅग्रोवनने माहिती दिली आहे.
हे ही वाचा : उद्याची बहुमत चाचणी कुणाच्या अध्यक्षतेखाली होणार?
यवतमाळ जिल्ह्यात यंदा नऊ लाख हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यंदा कापसाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. चार लाख हेक्टरवर कापसाची लागवड होणार आहे. शेतकऱ्यांना कल सोयाबीनकडे आहे. हवामान विभागाने यंदा मॉन्सून वेळेवर येईल, असा अंदाज वर्तविली होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. त्याला कृषी विभागानेही दुजोरा दिला आहे.
७५ मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन प्रशासन करीत आहेत. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांची पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन ते चार लाख हेक्टरवर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. पावसाने दांडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत. जवळपास दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. जिल्ह्यात दररोज पावसाच्या सरी कोसळत आहे. मात्र, पावसापेक्षा उकाडा जास्त आहे. परिणामी जमिनीत ओलावा नाही. त्यामुळे बियाणे 'जळत' आहे. आतापर्यंत कपाशी पेरणीला फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
हे ही वाचा : झाडी...डोंगार..नंतर समुद्राचे दर्शन, शिंदे गटाचा पुढचा मुक्काम गोव्यात?
कृषी केंद्रांत शेतकऱ्यांची गर्दी
पावसाअभावी पेरणी बाद होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पेरणी बाद झालेल्या ठिकाणी पेरणीसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली आहे. बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रांत गर्दी दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, Farmer protest, Yavatmal, Yavatmal news