जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आमदारकीच्या वर्षपूर्तीचा जल्लोष पडला महागात, MIM च्या आमदाराविरोधात गुन्हा

आमदारकीच्या वर्षपूर्तीचा जल्लोष पडला महागात, MIM च्या आमदाराविरोधात गुन्हा

आमदारकीच्या वर्षपूर्तीचा जल्लोष पडला महागात, MIM च्या आमदाराविरोधात गुन्हा

सार्वजनिक ठिकाणी केक कापून जल्लोष केल्याप्रकरणी पोलिसांना आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा…

  • -MIN READ
  • Last Updated :

मालेगाव, 27 ऑक्टोबर: विधानसभा निवडणूक विजयाची वर्षपूर्ती साजरी करणं मालेगावचे एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांना चांगलंच महागात पडलं आहे. सार्वजनिक ठिकाणी केक कापून जल्लोष केल्याप्रकरणी पोलिसांना आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेली माहिती अशी की, मालेगाव येथील मुशावरत चौकात शनिवारी सायंकाळी आमदार मुफ्ती यांनी कार्यकर्त्यांसह केक कापून आनंद साजरा केला होता. कोरोना संसर्गामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून एकत्रित कार्यक्रम घेण्यास प्रशासनानं बंदी घातली आहे. तरी देखील आमदार मुफ्ती यांनी भर चौकात कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत जल्लोष केली होता. हेही वाचा.. Unlock 5.0ची मुदत 30 नोव्हेंपर्यंत वाढवली, प्रतिबंधित क्षेत्रात Lockdown कायम मास्क न लावणे, रहदारीला अडथळा निर्माण करणे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, असा ठपका आमदार मुफ्ती यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार मुफ्ती इस्माईल, रिझवान खान, मोहंमद आमिन फारुख, डॉ. खालिद परवेज, अब्दुल्ला मुफ्ती इस्माईल, जाहिद मेम्बर, अतहर अश्रफी, खालिद सिकंदर, मसूद शाहिद व नियाज अहमद यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहे. दरम्यान, मालेगावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, प्रशासन आपल्या बाजुने चोख खबरदारी घेत आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाला अजुनही शहरात सायंकाळी सात ते सकाळी सात या वेळेत संचारबंदी लावाली लागत आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर रुग्णसंख्येत घट आली असून मृत्यूचं प्रमाण देखील खाली आलं आहे. शहरात सध्या केवळ 135 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. आता तर तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ग्रामीण भागात 153 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येताना दित आहे. हेही वाचा.. मराठ्यांना आरक्षण देण्यात सरकारला रस नाही, भाजपचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात तर मालेगाव संपूर्ण राज्यात चर्चेत होतं. संपूर्ण शहर कोरोनाच्या विळख्यात सापडलं होतं. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात