Home /News /maharashtra /

COVID-19: गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांची तपासणी हा फक्त देखावाच?

COVID-19: गुजरातमधून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांची तपासणी हा फक्त देखावाच?

तपासणी करण्यासाठी 16 थर्मल गन देण्यात आल्या होत्या. मात्र सद्यस्थितीत त्यापैकी फक्त सहा थर्मल गन कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.

पालघर 07 डिसेंबर: परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची COVID-19 तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यवस्था उभी केली आहे, मात्र ती अपुरी असल्याने फक्त औपचारीकताच पार पाडली जात असल्याचं चित्र पुढे आलं आहे. तलासरी तालुक्यात गुजरात-महाराष्ट्र सीमेवर ( Gujrat Maharashtra Border) दापचरी येथील वाहन तपासणी नाक्यासह अन्य चार ठिकाणी तपासणी व्यवस्था उभारण्यात आली आहे, मात्र त्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी व्यवस्था अपुरी असल्याने हे नाके औपचारिकतेचा आणि देखावाच ठरत असल्याची टीका होते आहे. त्याच प्रमाणे अनेक प्रवाशांची योग्य तपासणी होत नाही, त्यामुळे राज्यात प्रवेश करताना तपासणी करणं हा फक्त फार्स ठरण्याचीच शक्यता आहे. काही राज्यांमध्ये करोनाची दुसरी लाट उसळली असल्याने आजाराचा संसर्ग झालेल्या नागरिकांना राज्यात प्रवेश देऊ नये म्हणून परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी राज्यांच्या सीमेवर करण्यात येत आहे. त्यानुसार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या नागरिकांना दापचरी येथील वाहन तपासणी नाका या ठिकाणी तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तपासणी करण्याची व्यवस्था 25 नोव्हेंबर रोजी सुरू झाली असताना त्याठिकाणी 16 थर्मल गन देण्यात आल्या होत्या. मात्र सद्यस्थितीत त्यापैकी फक्त सहा थर्मल गन कार्यरत असल्याचे दिसून आले आहे. या तपासणी नाक्यावर सहा ते आठ लेन मधून गाड्या तपासून पुढे सोडण्यात येतात मात्र राज्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांचे तापमान तपासणीसाठी पुरेशा प्रमाणात यंत्रणा नसल्याने अनेक गाड्या तपासणीशिवाय पुढे जात असल्याचेही दिसून आले आहे. त्याच पद्धतीने लक्झरी बसेस व इतर प्रवासी वाहनांमधील नागरिकांची योग्य  प्रकारे तपासणी होत नसल्याने संपूर्ण व्यवस्था ही अतिशय अपुरी असल्याचं दिसून आलं आहे. नागपुरात मोठी राजकीय घडामोड, महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिला? 25 नोव्हेंबर पासून या तपासणी नाक्यांवर एकंदर 338 प्रवाशांना आजार सदृश्य लक्षण दिसल्याने त्यांची अँटीजेन चाचणी करण्यात आली मात्र त्यापैकी फक्त 1 नागरिकांला करोना संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. डहाणू तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता तपासणीसाठी आपल्या कार्यालयाने पुरेशा प्रमाणात थर्मल गन दिल्याचे सांगून हे उपकरण वारंवार बंद पडत असल्याने त्याचा तुटवडा भासत असल्याचे त्यांनी मान्य केले. ब्रिटीशांच्या काळात बांधलेलं संसद भवन होणार इतिहासजमा; अशी असेल नवी इमारत एकीकडे राज्यामध्ये करोना संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना परराज्यातून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणीत असा ढिसाळ कारभार होत असेल तर संसर्गाची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

पुढील बातम्या