मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपुरात मोठी राजकीय घडामोड, महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिला?

नागपुरात मोठी राजकीय घडामोड, महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिला?

शहराचे महापौर संदीप जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शहराचे महापौर संदीप जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शहराचे महापौर संदीप जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नागपूर, 7 डिसेंबर : विधानपरिषद निवडणुकीत नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्याने ही जागा राज्यभर चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर आता उपराजधानी नागपुरात एक मोठी घडामोड समोर येत असून शहराचे महापौर संदीप जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने संदीप जोशी यांनी महापौर पदाचाही राजीनामा दिला आहे, अशी माहिती नागपूरच्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने दिली आहे. संदीप जोशी यांनी महापौरपदाचा राजीनामा शहर भाजपच्या अध्यक्षांकडे दिल्याचे समजते. मात्र ही बातमी खोटी असल्याचा दावा भाजपच्या नागपूर शहराध्यक्षांनी केला आहे. भाजपच्या गडाचे बुरूज ढासळले... नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदा काँग्रेसनं बाजी मारत भाजपचा गड काबीज केला. नागपुरात भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 18 हजारहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला. भाजपच्या या पराभवानंतर अनेक कारण आणि चर्चांना उधाण आलं आहे. आतापर्यंत जनसंघ आणि नंतर भाजपचा मतदारसंघ असलेल्या नागपुरात भाजपच्या नाकावर टिचून मिळवलेल्या काँग्रेसच्या या विजयामुऴे काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आहे. तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना महापौर विरुद्ध आयुक्त असा वाद झाला होता. या वादानंतर तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. तुकराम मुंढे अडचणीत येतील यासाठी महापालिकेतून प्रयत्न केले जात होते. आता नागपूरच्या जनतेनं निवडणूक निकालातून याचं उत्तर दिल्याची चर्चा होत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: BJP, Nagpur

पुढील बातम्या